ताज्या घडामोडी

विमान कोसळल्याच्या बातमीने विजयनगरकर रात्रभर जागले

मात्र ती अफवा असल्याचे समजल्यानंतर.. त्यांनी सोडला सुटकेचा निश्वास.

प्रतिनिधीःप्रमोद राऊत कराड

विमान कोसळल्याच्या बातमीने विजयनगरकर रात्रभर जागले…मात्र ती अफवा असल्याचे समजल्यानंतर.. त्यांनी सोडला सुटकेचा निश्वास..
कराड .. विजयनगर डोंगराचा परिसर व तळबीड गावच्या हद्दीच्या दरम्यान काल रात्री अकराच्या सुमारास विमान कोसळल्याची जोरदार बातमी पसरली. त्यादरम्यान त्या परिसरातुन धुर येत होता आणि धुकेही होते. नेमके काय घडले आहे हे शोधण्यासाठी विजयनगरमधील युवकांनी रात्र जागुन काढली. मात्र सकाळी तसे काहीच नसल्याचे निष्पन्न झाल्यावर सर्वाचा जीव भांड्यात पडला. विजयनगर डोंगराचा परिसर आणि तळबीड गावच्या हद्दीपर्यंतच्या डोंगराच्या परिसरात काल रात्री मोठा आवाज झाला. तो आवाज त्या परिसरातील तीन ते चार किलोमीटर परिसरात ऐकू आला एवढा मोठा होता. त्यादरम्यान त्या परिसरातुन एक विमान खालुन गेले होते. त्यामुळे लोकांना ते विमानच पडले असा भास झाला. त्यामुळे त्याची बातमी वाऱ्यासारखी विजयनगर आणि परिसरात पसरली. त्यानंतर अनेकजण तेथे जमा झाले. काहींनी डोंगरावर जावुन शहानिशा करण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्र आणि धुके असल्याने त्यांना ते शक्य झाले नाही. दरम्यान काहींनी त्याची माहिती पोलिसांनाही दिली. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. नेमके काय घडले आहे याच्या विचारमंथनातच त्या परिसरात जमलेल्यांची रात्र जागुन गेली. सकाळी पुन्हा पोलिस, वन विभाग यांनी त्या परिसराची पाहणी केली. त्याचबरोबर विमानतळ व्यवस्थापक कृणाल देसाई यांनीही प्रशिक्षण केंद्राच्या विमानातुन त्या परिसराची डोंगरावरुन पाहणी केली. मात्र तेथे विमान पडलेले काही दिसले नाही. त्याचबरोबर अन्य काही पडले नसल्याचेही श्री. देसाई यांनी सांगितले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close