एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनेशी खेळू नका – आ.गुट्टे
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करा अन्यथा रासप राज्यभर तीव्र आंदोलन करेल आ. गुट्टे यांचा राज्य सरकारला इशारा.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
राज्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध न्याय मागण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या अंदोलनाला जाहीर पाठिंबा म्हणून रासपचे प्रदेशाध्यक्ष तथा गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली दि.११ नोव्हेंबर रोजी गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून गंगाखेड बसस्थानकासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. एसटी कर्मचाऱ्यांच्या योग्य व न्याय्य मागण्या राज्य सरकारने तात्काळ मंजूर कराव्यात अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष राज्यभर तीव्र आंदोलन करेल असा इशारा आमदार गुट्टे यांनी यावेळी दिला.
गेल्या अनेक वर्षापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आसून अत्यंत तुटपुंज्या पगारावर हे कर्मचारी काम करीत आहेत. त्यांना फारशी पगारवाढ नाही कोणतेही शासकीय लाभ मिळत नाहीत म्हणून या कर्मचाऱ्याने महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी २८ ऑक्टोबर पासून आंदोलन सुरू केले आहे. दिवसेंदिवस आंदोलन उग्र होत असताना राज्य शासन मात्र आंदोलनाकडे गांभीर्याने न पाहता कानाडोळा करीत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनेशी राज्यशासन खेळत असून हा खेळ एक दिवस राज्य सरकारला महागात पडेल.
एकीकडे एसटी कर्मचारी आत्महत्या करत असून राज्य सरकार हे आंदोलन दडपण्यासाठी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करत आहे. ही बाब अत्यंत निंदनीय व अशोभनीय असून जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रीय समाज पक्ष व गुट्टे काका मित्र मंडळ या कर्मचाऱ्यांच्या सदैव सोबत असेल. मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आपण मागे घेऊ नये असे एसटी कर्मचाऱ्यांना आवर्जून सांगताना कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने तात्काळ मंजूर नाही केल्या तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी यावेळी दिला. याप्रसंगी अनेक मान्यवरांसह एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना सर्वांसमोर मांडल्या.
यावेळी रासपचे मुख्य महासचिव बालासाहेब दोडतले,जि.प.सदस्य किशनराव भोसले, राजेश फड, जिल्हाध्यक्ष ॲड.संदिप अळनुरे,विधानसभा अध्यक्ष कृष्णा सोळंके, गंगाखेड प्रभारी हनुमंत मुंडे, नगरसेवक सत्यपाल साळवे, राधाकिशन शिंदे,राजू पटेल, सभापती मुंजाराम मुंडे,प.स. सदस्य मगर पोले, लक्ष्मण आप्पा मुंडे,नितीन बडे, शहराध्यक्ष शेख खालेद,राजेभाऊ बापू सातपुते, बाळासाहेब पौळ, संभाजी दादा पोले, संभूदेव मुंडे,राजू खान, महेश शेटे, इक्बाल चाऊस, सतीश घोबाळे,छोटू कांबळे,उद्धव शिंदे,वैजनाथ टोले यांच्यासह पालम येथील नगरसेवक असं खान पठाण, शेख गौस भाई, गणेशराव घोरपडे,भगवान शिरस्कर,शिवराम पैके, नवनाथ पोळ,बाळासाहेब इंगळे,पूर्णा येथील गणेशराव कदम,व्यंकटेश पवार, कैलास काळे,जगन्नाथ रेंगडे,गणेशराव गाढवे, मारुती मोहिते, शरद जोगदंड रासप व कुठे काका मित्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व एसटी महामंडळाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.