ताज्या घडामोडी

श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयाकडून वंचित घटकातील मुलांसाठी संस्कार वर्गाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

माजलगाव येथील श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयाने शहराजवळील गेवराई रोड भागातील पालावर वस्ती करून राहणाऱ्या भटक्या विमुक्त जमातीतील शिक्षणापासून वंचित घटकातील मुलांसाठी संस्कार वर्गाचे आयोजन केले आहे त्याचे उदघाटन आज संपन्न झाले. श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा उपक्रम घेण्यात येत आहे. या कार्यक्रमाची सुरुवात श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांच्या प्रतिमा पूजनाने व श्रीफळ वाढवून झाली. यावेळी श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाचे कार्यवाह अमरनाथ खुर्पे, शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी, उपमुख्याध्यापक विजयेंद्र चौधरी सर, पर्यवेक्षक रवींद्र खोडवे सर इत्यादी उपस्थित होते.
यापुर्वी येथील मुलांना शालेय शैक्षणिक साहित्य देण्यात आले आहे. या संस्कार वर्गाच्या माध्यमातून उजळणी पाठांतर, वर्णमाला, अक्षर ओळख तसेच सांघिक खेळ, पद्य, बोधकथा, बौद्धिक, स्वच्छतेच्या सवयी इत्यादी गोष्टी घेण्यात येणार आहेत. यावेळी विद्यालयातील शिक्षक कमलाकर झोडगे, पंडित मेंडके,परमेश्वर आदमाने, नवनाथ सांगुळे, मुकेश काळे, शिवशंकर भंडारे तसेच वस्तीतील ५० मुले मुली व पालक उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close