अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मल्लखांब स्पर्धेकरिता गोंडवाना विद्यापीठाचा संघ राजस्थान ला रवाना

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
वरोरा-दि.3 ते 6 एप्रिल 2022 दरम्यान खुशाल दास विद्यापीठ हनुमानगड, राजस्थान येथे होत असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धेकरिता गोंडवाना विद्यापीठाचा मुला,मुलींचा संघ दि.31/03/2022 ला राजस्थान येथे रवाना झाला. मुलांच्या संघामध्ये आनंद निकेतन महाविद्यालयाचे कुणाल दातारकर,लिलेश दडमल,अक्षय निखाते, ऐश्वर्य येटे, हर्षल धांडे, आदित्य डावे,ज्योती झाडे, उर्मिला जांभुडे, शितल पारोधे नंदिनी भाकरे,कल्यानी ताजने, मोनिका दुर्गम यांचा समावेश आहे तसेच संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक म्हणून प्रा.तानाजी बायस्कर,सुमित चव्हाण असे एकून बारा खेळाडूंचा संघ गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ प्रशांत बोकारे, प्र- कुलगुरू मा.डॉ.श्रीराम कावळे ,कुलसचिव डॉ. अनिल चिताडे ,क्रीडा संचालक मा.सौ.डॉ. अनिता लोखंडे, आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ मृणाल काळे,संघाचे प्रशिक्षक प्रा.तानाजी बायस्कर आणि संपूर्ण क्रिडा शिक्षकांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.