ताज्या घडामोडी

मूल नगरीत पार पडला दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा

जागतिक महिला दिना निमित्त 12 कर्तृत्ववान महिलांना राष्ट्रीय लोकहित सेवाचा सन्मान पुरस्कार बहाल

पुरस्कारात रंज्जू मोडक, वैजयंती गहुकर, उज्वला निमगडे, स्नेहा मडावी, किरण साळवी,सरोज हिवरेंचा समावेश

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

कला , क्रीडा, साहित्यिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात विशेष व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 12कर्तृत्ववान महिलांना काल शनिवार दि.9 मार्चला राष्ट्रीय लोकहित सेवाच्या वतीने मूल स्थित दर्पण वाचनालय, पत्रकार भवन येथे दुपारी 12 वाजता जागतिक महिला दिना निमित्त सन्मान पुरस्काराने मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.आयोजित समारंभाचे अध्यक्षस्थान चंद्रपूरच्या सुपरिचित अधिवक्ता पुनम वाघमारे यांनी विभूषित केले होते तर विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्रातील नामवंत महिला सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका तथा राजूराच्या जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे , सावलीच्या सुपरिचित कवयित्री शैला चिमड्यालवार यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती.याच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर निवासी कर्जमुक्ती अभियानाच्या गिता मेहर उपस्थित होत्या . उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणारा हा पुरस्कार सहज सुचलंच्या कर्तृत्ववान महिलांसाठी “खास “असल्याचे अधिवक्ता मेघा धोटे यांनी आपल्या भाषणातून आवर्जून सांगितले.कर्जमुक्ती अभियानात महिलांनी पुढाकार घेण्याचे आवाहन गीता मेहर यांनी केले तर अधिवक्ता पुनम वाघमारे यांनी आपल्या भाषणातून कायदे विषयक बाबत मोलाचे मार्गदर्शन या वेळी केले.राष्ट्रीय लोकहित सेवाचा हा सन्मान पुरस्कार प्राप्त करणा-यांत प्रामुख्याने चंद्रपूरच्या महिला सामाजिक कार्यकर्त्या तथा महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य संयोजिका रंजू दिलीप मोडक, विदर्भातील सुपरिचित कवयित्री तथा योगा शिक्षिका वैजयंती विकास गहुकर, दुर्गापूर- चंद्रपूरच्या मधूर व गोड आवाजाच्या गायिका उज्वला पद्माकर निमगडे,मूल तालुक्यातील चिरोली येथील आशा वर्कर श्रीमती पौर्णिमा राजेश कीर्तीवार,सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या भद्रावती व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटी भद्रावतीच्या संस्थापक अध्यक्ष कु. किरण विजय साळवी , शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भद्रावती तालुक्यातील शेगांव खूर्द येथील कु .प्रियंका पांडुरंग गायकवाड, पुण्यातील महिला पत्रकार कु. स्नेहा उत्तम मडावी मूल तालुक्यातील चिखलीच्या महिला पोलिस पाटील पुनम सुभाष मडावी, चंद्रपूर जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील राजूरा येथील योगा शिक्षिका तथा सुपरिचित समाजसेविका सरोज विठ्ठलराव हिवरे , ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या सामाजिक महिला कार्यकर्त्या चैताली निलेश आत्राम, बाळापूर तळोधी येथील प्राथमिक स्वास्थ्य आरोग्य केंद्रातील श्रीमती ज्योती संजय इंगळे ,व सोलापूर येथील प्रख्यात चित्रकार कु.रश्मी गजानन पचारे यांचा समावेश होता. उल्लेखनीय कामगिरी साठी मला मिळालेला हा पुरस्कार हा तरं खरं माझा नाही महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे व मेघाताई धोटे यांचा आहे.सामाजिक कार्य करतांना त्यांच्या कडून आज पर्यंत मला बरंच काही शिकायला मिळालं .वेळोवेळी सामाजिक कार्य करण्याचं प्रोत्साहन त्यांच्या कडून मिळालं अश्या शब्दात सन्मान पुरस्कार स्वीकारल्यानंतर सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक यांनी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली.गेल्या काही वर्षांपासून सहज सुचलं काव्यकुंजच्या माध्यमातून माझ्या स्वलिखीत काव्यरचना प्रकाशित झाल्या .मेघाताईने मला प्रोत्साहित केले.व आज एक उत्तम कवयित्री म्हणून पुरस्कार मिळाला याचा अतिशय मला आनंद झाला अश्या शब्दात या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तर प्रियंका गायकवाडने सहज सुचलं मुळे आपणांस वेळोवेळी मार्गदर्शन मिळाल्याची प्रतिक्रिया दिली विशेषतः रंज्जू मोडक यांच्या नावाचा तिने आपल्या बोलण्यातून स्पष्ट उल्लेख केला.आयोजक दत्तात्रय समर्थ व अर्चनाताई समर्थ यांनी माझ्या कार्याची दखल घेत मला हा सन्मान पुरस्कार बहाल केला असल्याची भावना दिव्यांग उज्वला निमगडे यांनी व्यक्त केली.कार्यक्रम स्थळी उपस्थितीतांनी पुरस्कार प्राप्त ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या प्रियंका गायकवाड यांचे तोंडभरून कौतुक केले तर अनेकांनी चित्रकार रश्मि पचारे यांचे अभिनंदन केले. पत्रकार भवनात आयोजित या कार्यक्रमाला प्रामुख्याने च़ंद्रपूरच्या सुपरिचित कवयित्री सविता कोट्टी -सातपूते ,फर्जना शेख , श्यामला बेलसरे,समता बन्सोड, राधिका बुक्कावार ,सीमा भसारकर, संगिता पाटील, अश्विनी कावलकर, किर्ती शहाने, नाजूका लाटकर,नझिमा महाजन, वाईजा अन्वर शेख,शकीला शेख , शमा शेख सारिका निमगडे यांच्या सह तालुक्यातील महिला व तरुणी उपस्थित होत्या.विशेषता पुरस्कार प्राप्त कर्तृत्ववान महिलांच्या परिवारातील सदस्य या पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाले होते.अनेकांनी राष्ट्रीय लोकहित सेवाने यंदाच्या वर्षात आरंभ केलेल्या या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय लोकहित सेवाचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ व त्यांच्या अर्धांगिनी सामाजिक महिला कार्यकर्त्या अर्चना समर्थ यांचे अभिनंदन केले.चार तास रंगलेल्या या दिमाखदार पुरस्कार सोहळ्याचे सुरेख संचालन मूल नगरीच्या सुपरिचित सामाजिक महिला कार्यकर्त्या तथा सहज सुचलंच्या सहसंयोजिका नलिनी आडपवार व दिलीप गेडाम यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close