ताज्या घडामोडी

पोक्सो कायद्याबद्दल मार्गदर्शन

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

सामान्य किमान कार्यक्रम माहे जानेवारी-२०२३ अंतर्गत तालुका विधी सेवा समिती, वरोरा तसेच पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक ०७/०१/२०२३ रोज शनिवारी ला ठिक दुपारी २.०० वाजता जिल्हा न्यायालय-१ वरोरा येथे संपन्न झाले. सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून  मा. सौ. पी. ए. जमाईवार, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, वरोरा प्रमुख पाहुणे म्हणून  मा. र. ना. बावणकर, अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा न्यायाधीश-१, वरोरा  विशेष उपस्थिती/सहभाग मा. श्री. ए.जे. फटाले, दिवाणी न्यायाधीश व.स्तर , वरोरा मा. श्री. डि. आर. पठाण, सह दिवाणी न्यायाधीश व.स्तर, वरोरा, मा. पी. के. रोकडे, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, वरोरा मा. के. के. खोमणे, २रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, वरोरा, श्री. अलंकार मरसकोल्हेहे, बाल विकास प्रकल्प अधिकारी, वरोरा, श्री. एन. एम. राउत, विस्तार अधिकारी शिक्षण पंचायत समिती, वरोरा तसेच  विवेकानंद माध्यमिक विद्यालय, वरोरा येथील ३२ विद्यार्थी व संबंधित शाळेतील मुख्याध्यापिका तसेच शिक्षका उपस्थितीत होते.  श्री. र. ना. बावणकर साहेब यांनी आपल्या भाषणात विद्यार्थींना प्रश्न करत पोक्सोसो कायदा यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच पी. ए.  जमाईवार मॅडम यांनी आपल्याया अध्यक्षीय भाषणात बाल लैगिंग अत्याचार संरक्षण कायदयाची माहिती दिली. कार्यक्रमाचाी प्रस्त्तावना/सुत्रसंचालन तसेच आभारप्रदर्शन  सौ. राधा सवाने मॅडम, उपप्राचार्य आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा यांनी मनःपूर्वक आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली. सदरच्याया कार्यक्रमात कार्यालयीन कर्मचारी श्री. एन. यू. उपरे, अधिक्षक, श्री. डी. वाय. भानूसे, व. लिपीक, श्री. वाय. डब्लू. कोडपकवार, क.लिपीक तसेच कार्यालयीन शिपाई उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close