चरुर (खटी) येथे ‘कृषी संजीवनी सप्ताह’
कृषीविद्यार्थीनी मार्फत विविध उपक्रम.
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
वरोरा तालुक्यातील चरूररूर ( खटी) येथेकृषीविद्यार्थीनीद्वारा दि. २५ जुन ते १ जुलै या कालावधीत ‘कृषी संजीवनी सप्ताह ‘ राबविण्यात आली होती. त्याअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसह गावात कृषदिंडी माध्यमातून विविध घोषवाक्यातुन जनजागृती करण्यात आली. तसेच खतांचा संतुलित वापर,पौष्टिक कडधान्यांचे महत्व, मुख्य पिकांवरील मित्र कीड व शत्रू कीड यांचे नियंत्रण आणि व्यवस्थापन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सरपंच. चंद्रकला वनसींगे, जि. प. शाळा चरुर (खटी) मुख्याध्यापक . प्रमोद जोगी, कर्मवीर उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक . वा. गहूकर , अंबुजा प्रक्षेय अधिकारी शिक्षक कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.
कृषीविद्यार्थीनींद्वारा हरितक्रांती दर्शवण्यासाठी वृक्षवाटप करण्यात आले. तसेच शेतीसोबतच विविध पुरकव्यवसायांचे महत्त्व पटवून देण्याकरिता कर्मवीर उच्च माध्यमिक शाळेत मधमाशीपालनावर प्रात्यक्षिक करून दाखविले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार, प्रभारी डॉ. रामचंद्र महाजन, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एन. पंचभाई , कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रदीप आकोटकर आणि विशेषतज्ञ श्री. नितीन गजबे व डॉ. सरीता दुधकावळे यांच्या मार्गदर्शनाखाली मधुमाशीपालनाचे प्रात्यक्षिक पार पडले.
या उपक्रमात सहभागी असलेल्या कृषीविद्यार्थीनीं कु. पल्लवी रामटेक, कु. आचल रोशनखेडे, कु. दिव्या राने, कु. अंजली पिंपळकर, कु. संचेती सोनुले, कु. श्रेया राउत यांनी ‘कृषी संजीवनी सप्ताह ‘ यशस्वीरीत्या पार पडला.