पोलीसांनी केले मोहफूलाच्या अवैध दारूभट्ट्या उध्वस्त
कूरखेडा पोलीसांची कारवाई.
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
कूरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे चव्हेला या ठिकाणी रविवार रोजी कूरखेडा पोलीसांनी धडक देत येथे अवैध पणे सूरू असलेले दोन मोहफूल दारूच्या भट्टया उध्वस्त करीत ७२० लिटर मोहदारू किमत १ लाख २४ हजार व १२ हजार २०० रूपये कीमतीचे ड्रम व जर्मन हंडे जप्त करीत दोन आरोपीना अटक केली.
अतिशय दूर्गम व संवेदनशील क्षेत्रात असलेल्या चव्हेला येथे मोठ्या प्रमाणात हातभट्टी द्वारे मोहफूलाची दारू गाळत अवैध विक्री करण्यात येत असल्याची अशी गोपनीय माहीती कूरखेडा पोलीसांना प्राप्त होताच रविवारला दूपारी दोन वाजेचा सूमारास पोलीसांनी चव्हेला येथे धडक दिली. यावेळी आरोपी दिपक सूखदेव पदा (२५)यांचा घरात सूरू असलेल्या अवैध भट्टीत ६०० लिटर दारू किमत १ लाख २० हजार व ९ हजार रुपए किमतीचे साहित्य असा एकूण १ लाख २९ हजार रुपयाचा मूद्देमाल जप्त करण्यात आले तर चव्हेला येथीलच आरोपी पतिराम सोमा खूरसाम वय-४० यांचा घरावर धडक दिली तिथे सूरू असलेल्या भट्टीत १२० लिटर दारू किमत २४ हजार व ३ हजार २०० रूपयाचे साहित्य जप्त करण्यात आले व दोन्ही आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९५१ चा कलम ६५(ई)(एफ)६९ अन्वये गून्हा दाखल करीत अटक केली. सदर कारवाई ठाणेदार अभय आष्टेकर, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे, पोलीस हवालदार गौरीशंकर भैसारे, पोलीस शिपाई ललीत जांभूळकर, भोजराज शिंदे, शैलेश राठोड़ यांचा चमूने केली.