सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पूर्णा तालुक्यातील फुलकळस केंद्राअंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद शाळा खडाळा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 189 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खडाळा गावचे सरपंच उत्तमराव शिंदे तर शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष परसराम हनवते ,सुरेश शिंदे ,मुख्याध्यापक व्यंकटराव जाधव, प्रा.किशोर उघडे आदींची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनीच संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन हाती घेऊन उत्कृष्ट पद्धतीने कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग मोरे यांनी केले या प्रसंगी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची समायोचित भाषणे झाली. यानंतर मुख्याध्यापक व्यंकटराव जाधव यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की विद्यार्थ्यांनी निश्चित ध्येय ठेवून त्या प्रमाणे मार्गक्रमण केले पाहिजे सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षणाची गंगा सर्वांचा घरोघरी पोहोचली आहे.
यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा.किशोर उगडे यांनी विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अडचणी आणि त्यावर उपाययोजना यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीच्या कु. शिवानी अंगद बेंडे व श्रुती अशोक शिंदे यांनी केले तर आभार राहुल काऊतकर यांनी मानले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिक्षक पांडुरंग मोरे, ज्ञानेश्वर साखरे,प्रल्हाद राठोड राहुल काऊतकर, वर्षा पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.