मराठवाडा विभागाच्या वतीनेपरभणी कोतवाली पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन साजरे

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 23/08/2024 रोजी परभणी येथे पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने , महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉ.संघपाल उमरे यांच्या नेतृत्वाखाली, व मुख्य सल्लागार सुभाष दादा सोळंके,मा.सौ.रेखाताई मनेरे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा महिला विभाग, मराठवाडा संघटक मा.अहेमद अन्सारी,मा.शेख अजहर हादगावकर मराठवाडा अध्यक्ष ,मा.शेख ईफतेखार बेलदार जिल्हा सचिव मा.सुनिल परदेशी नाशिक विभाग व इतर सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली परभणी कोतवाली पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला व पोलीस शिपाई कर्मचारी, .मा.सम्राट कोरडे यांना पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा मा.रेखाताई मनेरे यांच्या हस्ते राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण रक्षाबंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा देऊन पोलीस कर्मचारी शिपाई म्हेत्रे सर यांना जिल्हा उपाध्यक्ष परभणी महिला सौ.मीरा भारत नाईक यांच्या हस्ते राखी बांधून रक्षाबंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हा संघटक सौ.अंतिका सिताराम वाघमारे यांनी परभणी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये सर्व वरिष्ठ पदाधिकारी व कर्मचारी यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले बहिण, व भाऊ बहिणीचे प्रेम वृद्धिंगत व नाते संबंध टिकून व मजबूत करण्यासाठी आणि रक्षाणासाठी रक्षाबंधन साजरे केले सर्व वरिष्ठ महिला पदाधिकारी सौ.मीरा भारत नाईक, छाया प्रकाश अंभोरे,मा.सौ.रेखा मनेरे,व इतर सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली परभणीत कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये रक्षाबंधन निमित्त उपक्रम घेण्यात आला आणि परभणी कोतवाली पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या कार्याचे कौतुक करून आभार मानले .