ताज्या घडामोडी

पळसगांव वनविभागातर्फे मोफत गॅस सिलेंडर चे वाटप

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे

ग्रामीण भागात घरी गॅस जोडणी नसल्यामुळे जंगल शेजारी राहणारे ग्रामस्थ जंगलातील वृक्ष तोडून त्याचा स्वयंपाक व सरपणाकरिता सर्रास वापर करतात.त्यामुळे जंगलातील मौल्यवान वृक्षांची कत्तल होते.ही बाब लक्षात घेऊन वन विभागा कडून गॅस सिलिंडरसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जंगलाची वृक्षतोड होणार नाही, मौल्यवान झाडे नष्ट होणार नाही, या अपेक्षेने वन विभागाने ही महत्वपूर्ण योजना आखली आहे .
पळसगांव येथील गरीब कुटुंबांना वनविभागतर्फे मोफत गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले.पळसगांव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर.एन.थेमस्कर ,यांच्या हस्ते आज दिनांक २३ फरवरीला दुपारी ११वाजता वाटप करण्यात आले या वेळी गेडाम वनरक्षक,वनविभागतील कर्मचारी यांच्या उपस्थितीत गॅस कीटचे वितरण करण्यात आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close