ताज्या घडामोडी

परमानंद तिराणिक आदिवासी समाज कला भुषण पुरस्काराने सन्मानित

(स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात ना.गडकरींच्या हस्ते सन्मान)

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

जागतिक आदिवासी दिन व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासन आदिवासी विभागाद्वारे वनामती येथे आयोजित राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव व गुणगौरव सोहळ्यात आदिवासी कला संवर्धन समितीचे जिल्हाध्यक्ष तथा कला शिक्षक परमानंद तिराणिक यांच्या सामाजिक व कलाक्षेत्रात गेल्या पंचवीस वर्षांपासून जनजागृती करीत असल्याबद्दल यांच्या कार्याची दखल घेत नागपूर येथील वसंतराव नाईक सभागृहात उल्लेखनीय कामगिरीबाबत विशेष गुण – गौरव उत्कृष्ट कलावंत म्हणून केंद्रीय परिवहन व रस्ते वाहतूक मंत्री मा.ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते परमानंद तिराणिक यांना रुक्मिणी तिराणिक कुटुंबियांसह गौरविण्यात आले. यावेळी आदिवासी विभागाचे आयुक्त श्री. रविंद्र ठाकरे, सहाय्यक अप्पर आयुक्त दशरथ कुळमेथे, सहआयुक्त बबिता गिरी, जितेंद्र चौधरी यांच्या सह आदिवासी समाजातील व आतंरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारार्थी आदी उपस्थित होते.
पुरस्कार प्रदान करतेवेळी ना.गडकरी म्हणाले की आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी रस्ते, वीज, पाणी, व कनेक्टिव्हिटी या चार बाबतीत स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे त्यामुळे त्यांचाओढा आता शहरीशिक्षणाकडे वढला आहे. यापुढेही आदिवासी समाजबांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले. शिवाय ज्या ज्या ठिकाणी इंजिनिअरिंग, मेडिकल, आय.आय.टी , पोष्ट ग्रँज्युएट आणि विद्यापीठे आहेत त्या ठिकाणी मुलां – मुलींसाठी मोठे वसतिगृह चांगल्या पध्दतीने बांधून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी नि :शुल्क ठेवण्याचा सल्ला त्यांनी आदिवासी विभागाला दिला. आता आदिवासी समाजामध्येही हजारो डाँक्टर, इंजिनिअर , पत्रकार, वकील होत आहेत. आणि आता चित्रपटातही आदिवासी कलावंतना संधी मिळत आहे ही खरी समाजाची प्रगतीचे पाहुले आहेत असे ते म्हणाले, यावेळी नागपुरात निर्मिती करण्यात आलेल्या नागराज मंजूळे दिग्दर्शीत “झुंड” या चित्रपटातील सहकलावंत अभिनेते योगेश उईके यांनाही जाहीर सत्कार करण्यात आला आदिवासी समाजातील पहिल्या सेलिब्रिटी म्हणून असाही नामोल्लेख करण्यात येवून गौरव करण्यात आला. त्यासोबतच आदिवासी स्वातंत्र्यवीर कुटुंबीयांचाही ना.गडकरी साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close