ताज्या घडामोडी

किसान मित्र संस्था नेरी द्वारा बचत गटातील महिलांना उद्योग प्रशिक्षण

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) व किसान मित्र ग्रामीण विकास संस्था नेरी ता.चिमूर जी.चंद्रपूर यांच्या वतीने चिमूर जि.चंद्रपूर येथे दिनांक16 नोव्हेंबर 2021 रोज मंगळवारला नाबार्ड पुरस्कृत ईशक्ति व जे.एल.जी.प्रकल्पा अंतर्गत बचत गटातील महिलांना मार्गदर्शन व उद्योग प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले.

या प्रशिक्षनात मा.तृणाल फुलझेले साहेब सहायक प्रबंधक नाबार्ड चंद्रपूर, मा.शास्त्रकार साहेब शाखा अधिकारी,चंद्रपूर जिल्हा मध्य.सहकारी बँक चिमूर , मा.व्ही.एस.हेडाऊ साहेब शाखा प्रबंधक विदर्भ कोकण ग्रामीण बँक चिमूर ,मा.मानवटकर साहेब विदर्भ कोंकण ग्रामीण बँक चिमूर मा.पुरुषोत्तम वाळकेअध्यक्ष किसान मित्र संस्था नेरी,भारती गोळे सदस्य नगर परिषद चिमूर, नंदा वाळके ईत्यादी मान्यवर उपस्थित होते या प्रशिक्षणात मा.काळमेघ साहेब व हेडाऊ साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनात बचत गटातील महिलांनी उद्योगाचे प्रशिक्षण घेऊन उद्योग निर्मिती करावी व आर्थिक स्वावलंबी बनावे असे मनोगत व्यक्त केले, तर मा.फुलझेले साहेब यांनी नाबार्ड च्या विविध योजना व बचत गटातील महिलांनी नेतृत्व निर्माण करावे शासकीय योजनाचा लाभ घ्यावा गटाची नियमावली वापर करून गटात सक्षमता निर्माण करावी असे आव्हान केले. मा.पुरुषोत्तम वाळके यांनी ईशक्ती व जे.एल.जी.गटाबाबत ची संकल्पना व कर्ज धोरण या विषयी मार्गदर्शन केले. महिलांना उद्योग प्रशिक्षण पुरुषोत्तम वाळके व ज्ञानेश्वर कामडी यांनी प्रात्यक्षिकसह दिले या मध्ये 1)वॉशिंग पावडर.2)फिनाईल. 3)हँड वॉस.4)ग्लास क्लीनर.5) टॉयलेट क्लीनर.6)परफ्युम सेंट. 7)बर्तन क्लीनर.8)नीळ बनविणे या उद्योगाचे प्रात्यक्षिक सह प्रशिक्षण देण्यात आले .या प्रशिक्षणाचे आयोजन अपना मंगल कार्यालय सभागृह चिमूर जिल्हा चंद्रपूर येथे करण्यात आले.कार्यकर्माचे सूत्र संचालन नंदा वाळके यांनी केले तर आभार प्रदर्शन किशोर पोहीणकर व नितीन नगराळे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याशाठी सिद्धांत वाळके, मयुरी काळमेघ, शक्ती बंगारे, शीतल सोरदे,रेणुका फुसे, रजनी गुळदे, सुनंदा सतिकोसरे, प्रतिभा दानव,यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला चिमूर,काग,नवेगाव पेट,वडाळा,सोनेगाव,बाम्हनी, तळोधी, तुकूम,येथील जे.एल. जी.व बचत गटातील महिलां सहभागी होत्या. ईतर बचत गटांना उद्योग प्रशिक्षण घ्यायचे असेल त्यांनी सम्पर्क साधावा .
श्री पुरुषोत्तम वाळके अध्यक्ष, संस्थेचा पत्ता : C/O गुरुदेव पत संस्था बिल्डिंग नेरी (चिमूर ) जिल्हा. चंद्रपूर महाराष्ट्र येथे संपर्क मोबा. 9421707602 ला साधावा. 👉👉👉वरील उद्योग साहित्य अल्पदरात 4300 /रुपयात उद्योग साहित्य किट्स विक्री करीता संस्थेत उपलब्ध आहेत. असे पत्रकांद्वारे पुरुषोत्तम वाळके यांनी कळविले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close