अखेर नवीन वाचनालय अभ्यासकांकरिता खुला
तालुका राष्ट्रवादी पक्षाचा पुढाकार
ग्रामीण प्रतिनिधी : टिकेस्वर चेटुले दिघोरी
मागील पंधरादिवसापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन वाचनालय इमारत उपलब्ध करून देण्याची मागणीला घेऊन तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने नगरपंचायत प्रशासनाला धारेवर धरले. नगरपंचायत सीओ यांनी सात दिवसात नवीन वाचनालय इमारत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार असे आश्वासन दिले होते. परंतु वाचनालयाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रोटोकालचे पालन न केल्याचा ठपका ठेवत सीओ याना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी नियोजित वाचनालय उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला, प्रत्यक्ष सीओ यांनी मात्र यावेळी काढता पाय घेत कार्यालायत येणे टाळले व दि. 22 सप्टेंबरला कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांकरिता सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी भंडारा येथील डीपीओ जाधव साहेब यांचेसोबत बिडीसीसी चे अध्यक्ष सुनीलभाऊ फुंडे यांनी मोबाईलवर बोलून दि. 22 सप्टेंबरला कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांकरिता वाचनालय सुरू करण्याच्या सूचना केल्या. अखेर आज नवीन वाचनालय इमारतीचे कुलूप उघडून नगरपंचायत सीओ यांनी विद्यार्थ्यांना इमारत उपलब्ध करून दिली. तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दणका कामात आला असून यापुढेही जनहितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढाकार घेत राहील असे याप्रसंगी तालुकाध्यक्ष बालू भाऊ चुन्ने यांनी बोलून दाखविले, शहराध्यक्ष अँड, मोहन राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शहर निरीक्षक प्रमोद भाऊ प्रधान, देवानंद नागदेवे माजी नगरसेवक, शहर उपाध्यक्ष श्रीकांत रणदिवे, महासचिव हेमंत नाकतोडे, मिलिंदजी डोंगरे, सुभाषजी दिवटे, संजय नहले, अर्जुन घरत, नरेश सतिमेश्राम, वैभव खोब्रागडे, युवक अध्यक्ष राकेश राऊत, आशिष दिवटे, उद्धव मांडे, भारत राऊत व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.