आपसी वादातून तरुणाची हत्या
भंडारा शहरातील चांदणीचौक
परिसरातील घटना.
प्रतिनिधी: नरेंद्र मेश्राम लाखनी
भंडारा शहरतील चांदणीचौक परिसरात आपसी बादातून १८-१९ वर्षाचा तरुणाचा आपसी वादातून चाकूने भोसकून निघृण हत्या केली. सदर घटना दि.१२ डिसेंबर २०२१ रोजी रात्री ९.१५ वाजता दरम्यान घडली. मयदू राजेश पाटील असे मृतक तरुणाचे नाव आहे.
मृतक व आरोपी यांच्यात दोन-तीन दिवसापूर्वी कडाक्याचे भांडण झाल्याचे सांगितले जाते. दि.१२ डिसेंबररोजी चांदणीचौक परिसरात आरोपीने मयदू पाटील नामक तरुणाबर चाकूने सपासप वार केले. क्षणातच मयदू रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेची माहिती भंडारा पोलीसांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठूनजखमी तरुणाला जिल्हासामान्य रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सदर हत्या ही आपसी वादातून झाल्याचे बोलले जात आहे. घटनेनंतर अज्ञात आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. पोलीस आरोपीच्या शोधात असून वृत्त लिहीपर्यंत आरोपीचे नाब व हत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. या घटनेमुळे काही काळ घटनास्थळ परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. याकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष ठेवून आहेत.