ताज्या घडामोडी

बस स्टॉप व तहसिल कार्यालय गेट समोरील अवैध ट्रॉव्हल्स वाहतूक हटविण्यात यावी

उपविभागीय पोलिस अधिकारी यांना शिवसेना तालुका उपप्रमुख केवलसींग जुनी यांचे कडून निवेदन देण्यात आले

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे

चिमूर शहरामध्ये खुप मोठया प्रमाणात तहसिल कार्यालय व बस स्टॉप समोर जनतेची व शाळेकरी मुलामुलींची हलचल राहते. अवैध वाहतुक ट्रॅव्हल्यचे चालक वाहक हे बस स्टॉप व तहसिल कार्यालय जवळ ट्रॅव्हल्स उभे करतात. तसेच खुप मोठया प्रमाणात हार्न वाजवतात, आवाज करतात. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या मुला मुलींना तसेच नागरीकांना नाहरकत त्रास सहन करावा लागतो.

सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयानुसार अवैध वाहतुक बसस्टॉप व प्रशासकीय भवन
कार्यालय पासून आंदाजे १०० मीटरच्या आत उभे करण्यास सक्त मनाई आहे. असे असताना सुध्दा अवैध वाहतुक करणारे ट्रॅव्हल्सधारक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला बगल देत आहेत.

चिमूर आगारातील आगार व्यवस्थापकास मारहाण करण्यात आलेली आहे. अवैध वाहतुकीच्या विरोधात
चिमूर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अवैध ट्रॅव्हल्स उभी असल्याने वाहतुक करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यामुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बसस्टॉप मधील प्रवाशांना ट्रॅव्हल्समध्ये बसण्याकरीता अरेरावी करीत असतात. या सर्व बाबींचा जनतेला खुप त्रास सहन
करावा लागत आहे. या करीता गांभीर्याने दखल घेवुन योग्य ती कारवाई करावी असे निवेदन शिवसेनेचे उपतालुका प्रमुख केवलसिंग जुनी यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी यांना दिले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close