शिक्षक भारती नागपूर विभागीय कार्यकारिणी जाहीर
अध्यक्षपदी सुरेश डांगे तर सरचिटणीसपदी शरद काकडे
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
आमदार कपिल पाटील यांचे मार्गदर्शनात शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी हे ब्रीद घेऊन शिक्षकांच्या न्यायासाठी लढणा-या शिक्षक भारती संघटनेची नागपूर विभागाची कार्यकारिणी राज्य अध्यक्ष नवनाथ गेंड यांनी अलिकडेच जाहीर केली.
या कार्यकारिणीत विभागीय अध्यक्ष सुरेश डांगे(चंद्रपूर),सरचिटणीस शरद काकडे(नागपूर), उपाध्यक्ष गुलाबराव मौदेकर(गोंदिया),संजय मेश्राम(गडचिरोली),कमलेश दुपारे(भंडारा),राजू भिवगडे(नागपूर),
सहसरचिटणीस नंदकिशोर कातुरे(नागपूर),प्रसिद्धीप्रमुख संतोष बाऱ्हेवार(गोंदिया),कोषाध्यक्ष मनोजकुमार नांदगाये(गोंदिया),महिला अध्यक्ष नलिनी नागरिकर(गोंदिया),महिला सरचिटणीस आशा दाकोटे(गडचिरोली) यांचा समावेश आहे.आमदार कपिल पाटील यांचे मार्गदर्शनात आणि राज्य अध्यक्ष नवनाथ गेंड यांचे नेतृत्वात शिक्षक भारतीच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यास आम्ही कटीबद्ध असल्याचे कार्यकारिणीतील सदस्यांनी म्हटले आहे.
नवनियुक्त कार्यकारिणीचे राज्य अध्यक्ष नवनाथ गेंड,कार्याध्यक्ष दिनेश खोसे,सरचिटणीस भरत शेलार,उपाध्यक्ष प्रकाश ब्राह्मणकर,महिला अध्यक्ष स्वाती बेंडभर आदींनी अभिनंदन केले आहे.