ताज्या घडामोडी

चिमूर वडाळा पैकु २४२ या सर्व्ह नंबर या जागेमधून मधोमध हायटेन्शन वीज गेली असून त्या लेआऊट ला N A ची परमिशन दिली कशी ?

नगर रचनाकार या कार्यालयात NA ची परमिशन देणारा तो अधिकारी कोण

मुख्य संपादक : श्री सुशांत इन्दोरकर

चिमूर तालुक्याची जिल्हा निर्मितीची चाहूल लागताच बाहेर व चिमूर परिसरात अनेक गर्भ श्रीमंत असणारे लोक जागेच्या व्यवसाया कडे वळत आहे
गेल्या काही वर्षां पासून घेत असलेल्या शेतकऱ्यां कडून व सर्वसामान्य जनते कडून घेत असलेल्या जागेच्या तक्रारी वाढत आहे.जी जागा N A सुद्धा ह्या जागावर लेआऊट पाडून विकल्या जात आहेत,अशा प्रकारचा गौरख धंदा चिमूर तालुक्यात सुरू असून
चिमूर वडाळा पैकु लागून असलेल्या सर्व्ह न. २४२ आराजी १.२१ एवढी जागा ही मोसिन हुसेन बंदाली याच्या मालकीची असून ती जागा काही नेहमीच लेआऊट चा व्यवसाय करणाऱ्या लोकांनी घेतली असल्याने शिवालय पार्क 3 व त्याच्या मधोमध जागे वरून हायटेन्शन लाईनचे खांब गेले असता त्या जागेला नगर रचनाकार या कार्यालयात त्याना NA परमिशन दिली कशी ? नियम ज्या जागेवरून हायटेन्शन लाईन खांब गेले आहे त्या जागेला NA ची परमिशन मिळत नाही हा नियम असून सुद्धा काही लेआऊट चा व्यवसाय करणारे लोक संबंधीत अधिकाऱ्यां सोबत पैशाची देवाण घेवाण करून त्या जागेला N A परमिशन देऊन त्या जागेवर घर बांधकाम करून राहणाऱ्या लोकांच्या जीवाशी खेळत आहे व त्याच्या समोर असलेल्या पुरुषोत्तम बांगला कँनव्हेट ही शाळा असल्याने त्या शाळेत पहिली ते दहावी पर्यन्त शिक्षण दिले जात असून त्या शाळेत मध्ये दररोज लहान मुलां पासून तर मोठ्या मुलांच्या पर्यंत नेहमीच त्या शिवालय पार्कच्या 3 मधून ये जा करावी लागते परंतु या कोरोनाच्या महामारी मध्ये बांगला कानव्हेट शाळा बंद आहे परन्तु ती शाळा जेव्हा सुरू झाल्यास व शिवालय पार्क 3 मध्ये व त्याच्या बाजूला असलेल्या खाली जागेवर लेआऊट पाडून त्या लेआऊट मध्ये घर बाधून असणाऱ्या लोकांन सोबत अनर्थ होऊ शकते त्या मध्ये वित्त व जीवितहानी होण्याचे टाळता येत नसल्याने त्या मुळे जीवितहानी व वित्त हानी ला जवाबदार तो लेआऊट विकणारा की त्या जागेला NA ची परमिशन देणारे अधिकारी राहतील हा एक प्रश्नच आहे ज्या जागेवरून हायटेन्शन वीज गेली आहे ती जागा कमी पैशात शेतकरी व सर्व साधारण लोकांकडून कमी पैशात घ्यायची व त्या लेआऊट मध्ये नगर रचनाकार या कार्यालयातून गोलमाल करून NA ची परमिशन काढून त्याचं जागेवर लेआऊट पाडून ती जागा जास्त भावात विकायची असल्या प्रकारचा धंदा सध्या कोरोना च्या काळात चिमूर परिसरात जोमात सुरू असून या कडे कोणतेही वरीष्ठ अधीकारी लक्ष देत नसल्याने लेआऊट दिवसेंदिवस विकणाऱ्या लोकांच्या हिंमती वाढत जात आहे व प्लांट विकून लोकांच्या जिवाशी खेळ करत असल्याने अशा हायटेन्शन विजेच्या खाली त्या लेआऊट ला N A ची परमिशन देणारे अधिकारी कोण ? व त्या अधिकाऱ्यां वर कारवाही होईल का अशी चर्चा सध्या चिमूर तालुक्यात रंगू लागली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close