रूग्णकल्यान समित्यांमार्फत जिल्हातील रूग्णलयांमध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा तातडीने करा

अक्षय लांजेवार चंद्रपुर समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळाचे जिल्हाधक्ष यांची मागनी
मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
जिल्हयात कोरोनाने थैमान घातले आहे . कोरोना वायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे परिस्थिती अती चिंताजनक असुन विशेषत शहरी भागा प्रमाणे ग्रामिण भागात पण गंभीर स्थिती निर्माण झाली आहे . प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येणाऱ्या गावात दिवसेंदिवस रूग्णांमध्ये आकडा वाढत चालला आहे . अनेक गंभीर रूग्णांना आक्सिझन मिळत नसल्याने आपले जीव गमवावे लागत आहे . रूग्णकल्यान समिती मार्फत जिल्हातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात १० तर उपजिल्हा व ग्रामिण रूग्णालयात किमान २० ऑक्सिझन सिलेंडर व २ आक्सिझन कांस्ट्रेटर उपलब्ध करून द्वयावे . अशी मागणी समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ चंद्रपुरचे जिल्हाधक्ष अक्षय लांजेवार यांनी प्रसिध्दि पत्रकात म्हटले आहे . आक्सिझन सिलेंडरची उपलब्धता राहिल्यास मृत्युचे प्रमाण कमी होवुन अनेकांचे प्राण वाचतील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केद्रातंर्गत रूग्णकल्याण समिती असुन प्रत्येक रूग्णालयाचा रूग्णकल्यान समितीकडे असणाऱ्या निधीतुन ऑक्सिझन सिलेंडर व ऑक्सिझन कांस्ट्रेटर घेण्यात यावे . या समितीकडे १.५० लक्ष रूपये खर्चात असताना सद्याची कोविड -१ ९ ची परिस्थिती लक्षात घेता या समित्या मार्फत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात १०-१० ऑक्सिझन सिलेंडर घेण्यात यावे जेणेकरून जिल्हातील रूग्णांना ऑक्सिझन अभावी आपला जिव गमवावा लागणार नाही . तरी याबाबत तातडीने निर्णय घेऊन रूग्णकल्याण समिती मार्फत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात १० ऑक्सिझन सिलेंडर घेण्या संदर्भात संबधिताना तातडीने आदेशित करावे अशी मागणी समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळाचे चंद्रपुर जिल्हाधक्ष अक्षय लांजेवार यांनी केली .