ताज्या घडामोडी

नागभीड येथे तरुणाचा मृत्यु

तालुका प्रतिनिधी:कु. कल्यानी मुनघाटे नागभीड

नागभीड: एका तरुणाचा म्रुत्यु विद्युत शाॅकने झाला की, ह्रदयविकाराच्या झटक्याने याबद्दल तर्क काढले जात असेल तरी याचा उलगडा शवविच्छेदन अहवालानंतरच माहित होणार आहे. भाष्कर पुरुषोत्तम दुरबुडे (३१) असे म्रुतक तरुणाचे नाव आहे. म्रुतक युवक नागभीड येथील एका वेल्डिंग च्या दुकानात वेल्डर चा काम करीत होता. गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास त्याचे वेल्डिंग चे काम करत असताना सौम्य विद्युत शाॅक लागला असे सांगितले जात आहे.

यावेळी बाजुलाच असलेल्या एका व्यक्तीस याने आवाज दिला. भाष्कर चा आवाज येताच आजुबाजूला असलेले लोक मदतीसाठी धावले व त्यांनी लगेच उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र , डाॅक्टरांनी म्रुत घोषित केले. भाष्कर ला शाॅक लागल्याचे त्यांनी सांगितले जात असेल तरी मात्र शाॅक लागल्याच्या कोणत्याही खुणा त्याच्या शरीरावर आढळल्या नाही. त्यामुळे भाष्कर चा म्रुत्यु ह्रदयविकाराच्या झटक्याने कींवा अन्य कारणांमुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीसांना याबाबत कळविण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा आणि ग्रामीण रुग्णालयात प्रेताचा पंचनामा केला. म्रुतक नागभीड येथुन ७ किमीवर असलेल्या मिंडाळा येथील रहिवासी असून मागील वर्षी च त्याचे लग्न झाले होते . त्याच्या अकाली निधनानंतर हळहळ व्यक्त होत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close