आई वडीलांचा पाठिंबा, तिसऱ्या प्रयत्नात हादगांव बु ची लेक कालवा निरीक्षक

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
ग्रामस्थांच्या वतीने अनिलराव नखाते यांनी केला सत्कार.
जिद्द अन् मेहनतीतून केले स्वप्न पूर्ण.
जिद्द उराशी बाळगून मेहनत केल्यावर यश हे नक्की मिळतेच,सोनाली मदनराव नखाते हिच्या बाबतीतही असेच झाले.उच्च पदाचे स्वप्न उराशी बाळगताना कौटुंबिक जेमतेम आर्थिक परिस्थितीवर मात करीत अन् आई वडीलांचा पाठिंबा व सेल्फ स्टडीतून तिसऱ्या प्रयत्नात पाठबंधारे विभागात कालवा निरीक्षक म्हणून तिची निवड झाली.या यशाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने शनीवारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांनी सोनालीचा सत्कार केला.
हादगांव बु.येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे गट सचिव मदनराव नखाते यांच्या सामान्य कुटुंबातील सोनालीने दहावी पर्यंत चे शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत पुर्ण केले. पुढे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करतांना तिने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. यातून २०१७ साली एसटीआय ची परिक्षा दिली पण हा प्रयत्न पुर्णत्वास गेला नाही. त्यानंतर मंत्रालयातील पदासाठी परिक्षा दिली पण अपयश आले.दोन वेळा अपयश आल्यानंतरही न खचता जिद्दीने व परिश्रमातून पाठबंधारे विभागाच्या दिलेल्या परिक्षेचा निकाल ३१ जुलै रोजी मध्यरात्री म्हणजे ११:३० वा जाहीर झाला. यामध्ये सोनाली नखाते यांची कालवा निरीक्षक पदावर निवड झाली.हि मध्यरात्र कुटुंबासाठी आनंदाची ठरली.ग्रामस्थांच्या वतीने शनीवारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांनी
सोनाली नखाते,वडील मदनराव नखाते यांचा सत्कार केला.सोनालीने मेहनत घेऊन जिद्दीने मिळवीलेले यश हे हादगांव बु येथील मुला मुलींनी आदर्श घेण्यासारखे आहे असे गौरवोद्गार सभापती अनिलराव नखाते यांनी व्यक्त केले.याप्रसंगी सरपंच बिभीषण नखाते,चेअरमन बाबासाहेब नखाते,ग्रा.पं. सदस्य प्रशांत नखाते,बि.टी.कदम सोसायटी सदस्य सुनिल नखाते,देविदास शिंदे,पंडित आबा नखाते,रामचंद्र बापु नखाते,बापुराव नखाते,गणेश निर्वळ,शिवा काका नखाते,भास्कर आबा नखाते,मदन नखाते,गंगाधर नखाते व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
दोन पैकी एक वेळा प्रतिक्षा यादीत नांव होते; परंतु निवड झाली नाही. त्यामुळे मी न खचता आणखी जोमाने तयारी केली. या वेळेस मला यश मिळाले. माझ्या यशात आई, वडील,शिक्षक यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच माझी आज कालवा निरीक्षक म्हणून निवड झाली. यापुढे स्पर्धा परिक्षा देऊन प्रथमवर्ग प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय आहे.असे मनोगत सोनाली नखाते यांनी व्यक्त केले.