नागझिरा अभयारण्यातील अधिकाऱ्यांची कँटीनधारकावर कारवाही
कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कँटीन टेंडर रद्द, रात्री साडेअकरा वाजता कँटीनधारकांना काढले बाहेर जंगलात.
अधिकाऱ्यांची नवीन कँटीनधारकासोबत साठगाठ: – फिर्यादीचा आरोप
उपसंपादक: विशाल इन्दोरकर
नवेगाव: फिर्यादी मंगलदीप कृष्णकुमार भावे मु. चिंचगावटोला, ता. गोरेगाव, जि. गोंदिया हे दि ०१/१०/२०२१ पासून मिळालेल्या निविदेनुसार नागझिरा अभयारण्य उपहारगृह FDCM येथील कँटीन चालवत होते. तसे ते २०१९ पासून वेळोवेळी मिळालेल्या निविदेनुसार कँटीन चालवीत होते.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार दि ३०/११/२०२१ ला रात्री ११:३० वाजता RFO वि एम भोसले यांनी कँटीन मध्ये येऊन आदेश आहेत असे सांगून तिथे काम करणारे कामगार व फिर्यादीचे सिकलसेल ग्रस्त अपंग भाऊ यांना रात्रीच कँटीन चे बाहेर खुल्या जंगलात काढले. फिर्यादीचा भाऊ यांनी विनंती केली की ते सकाळी कँटीन मधून जातील. पण अधिकाऱ्याने डी एम साहेब आणि उपसंचालक मॅडम पूनम पाटे यांचा आदेश आहे असे सांगून कारवाही केली व बळजबरीने पंचनामा लिहून सह्या घेतल्या.
फिर्यादीचे म्हणणे असे की, त्यांनी दि ३०/११/२०२१ ला सायंकाळी ४ वाजता रिसॉर्ट मॅनेजर अमित लोखंडे यांचेकडे मासिक भाडे रक्कम ७१५०० रुपये जमा केले. व गावला जात असताना (डी एम) नितीनकुमार सिंह यांचा फोन आला. त्यांनी कँटीन ची निविदा रद्द केल्याचे सांगितले. सोबतच “तेरी कँटीन चालणे की औकात नही महेरे धेड तू अभी के अभी कँटीन बंद करके चला जा नही तो मै तुझे मार के तेरा सामान बाहर फेक दुंगा, और तेरी डीडी और सामान भी मै वापस नही देता” असे बोलले.
फिर्यादीला शासन निविदा मंजूर झाल्यावर कार्यारंभ आदेश मिळण्यासाठी १८ दिवस लागले आणि वन विभागाच्या परवानगी साठी ३ दिवस लागले. पण आता विणासुचना एका दिवसात अचानक कँटीन टेंडर कसे काय रद्द केले व नवीन कँटीन धारकास कोणतीही धावपळ न करता तुरंत एका दिवसात वर्क ऑर्डर कसे काय मिळाले?.. यावरून नवीन कँटीन धारक व अधिकारी यांच्यात साटेलोटे आहे हे सिद्ध होते असे फिर्यादीचे म्हणणे आहे.
या प्रकरणामुळे माझी मानहानी झाली आहे. मी व माझे मानसं बेरोजगार झाले आहेत व मला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. तरी सदर अधिकाऱ्यांवर बळजबरी, मानसिक छळ, धमकी, व आत्महत्येस प्रवृत्त करणे इत्यादी आरोप फिर्यादीने केले असुन तशी तक्रार मा. आर. एम. रामाणूजम वनरक्षक तथा क्षेत्रसंचालक नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया यांचेकडे केली आहे.