नगर परिषद चिमूरच्या भाजपच्या गटनेते पदी भाजपचे युवा नेते संजय नवघडे यांची निवड

प्रतिनिधी:राहुल गहुकर
नुकत्याच पार पडलेल्या चिमूर नगर परिषदच्या निवडणुकीत लोकनेते आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्याविकास कार्यावर विश्वास टाकत नगरअध्यक्ष सहित तब्बल 14 नगरसेवक यांनी विजय प्राप्त केला
आज जिल्हधिकारी चंद्रपूर यांच्या कडे भाजपचा गट स्थापन करण्यासाठी भाजपचे सर्व नगरसेवक उपस्थित होते तेव्हा भाजपचे युवा नेते, संजय गांधी निराधार योजना समिती चिमूरचे अध्यक्ष संजय नवघडे यांची भाजपच्या गटनेते पदी सर्वानुमते निवड करण्यात आली
याप्रसंगी आज चंद्रपूर येथील प्रसिद्ध माता महाकाली यांचे दर्शन घेत पुढील चिमूर नगर परिषद चा विकास रथ नक्कीच पुढे नेऊन चिमूर क्रांती भूमीचा विकास करणार असल्याचे याप्रसंगी नगरअध्यक्ष, गटनेते, नगरसेवक यांनी सांगितले
याप्रसंगी नवनियुक्त गटनेते संजय नवघडे, चिमूर नगर परिषदच्या अध्यक्ष गीताताई लिंगायत, नगरसेवक सर्वश्री कांचन खाटीक,भारती हजारे, पराग अंबादे, गजानन चवरे, नलिनी लांडे,कल्याणी लांबे, भारती गोडे,कविता धारणे, कुणाल कावरे,दुर्गा सातपुते, कविता बाणकर, प्रशांत तळवेकर,नीता लांडगे, दिगांबर बेंडे उपस्थित होते








