ताज्या घडामोडी

शिक्षणमहर्षी डाॕ.पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतींना जि.प.उ.प्राथ.शाळा वाघनख कडून अभिवादन

प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

१० एप्रिल शिक्षणमहर्षी डाॕ.पंजाबराव देशमुख यांचा स्मृतीदिनी जि.प.चंद्रपूर पं.स.वरोरा अंतर्गत जि.प.उ.प्राथ.शाळा वाघनख द्वारा अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र सालेकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,२७ डिसेंबर १८९८ या दिवशी जन्माला आलेले भारतमातेचे सुपुत्र भारताचे पहिले कृषिमंत्री भाऊसाहेब डाॕ.पंजाबराव देशमुख यांचा आज स्मृतिदिन. त्यांनी ग्रामीण शेतकरी गोरगरीबांच्या मुलांसाठी तिनशेच्या वर शिवाजी शिक्षणसंस्थांची निर्मीती केली. यासाठी त्यांनी स्वतःचे घर गहान ठेवले,पत्नीचे दागीने विकले अशा अनेक समस्यांच्या तोंड दिले. परंतु एकच ध्यास गोरगरीबांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं. शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडून यावी यासाठी त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक अधिवेशन भरविण्याची सुरुवात त्यांनी केली. एवढेच नव्हे तर कृषीमंत्री असतांना पहिले आंतरराष्ट्रीय कृषिप्रदर्शन भरवून कृषिप्रदर्शनाची सुरुवात त्यांनी केली. कृषिक्षेत्रात भारताला स्वयंपुर्ण करण्यासाठी त्यांनी कृषिविद्यापीठांची निर्मिती केली म्हणून त्यांना कृषिविद्यापीठाचे जनक असेही म्हणतात. यांच्या या महान कार्याची दखल घेवून त्यांच्या स्मरणार्थ पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार दरवर्षी कृषिक्षेत्रात भरीव योगदान असणाऱ्यास कृषिरत्न पुरस्काराने गौरन्वीत केल्या जाते.
धार्मिक स्थळांच्या संपत्तीचे राष्ट्रीयकरण करुन ती संपत्ती गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी,त्यांच्या उद्धारासाठी खर्च करावी असे बील संसदेत मांडले परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही तसा जर कायदा झाला असता तर आज भारत सोन्याची चिडियाॕ असती,विश्वामध्ये सर्वात श्रीमंत देश असता. शेतकऱ्याच्या मुलाला आरक्षण मिळाले पाहिजे हा आग्रह त्यांनी धरला होता यावरुन ते शेतकऱ्यांचे किती मसिहा होते हे लक्षात येते. शेतकरी हा ओबीसी समाज तेव्हा डाॕ.बाबासाहेब आंबेडकर संविधानाचा ड्राॕफ्ट तयार करीत असतांना ओबीसींसाठी संविधानात आरक्षणाची तरतुद करावी म्हणून डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांची त्यांनी भेट घेतली असता सुचवायच्या अगोदरच बाबासाहेबांनी ओबीसीच्या ३४० व्या कलमाचा ड्राफ्ट मध्ये अंतर्भाव केल्याचे बघून गहिवरुन डोळ्यात पाणी आणनारे डाॕ.पंजाबराव देशमुख जनतेप्रती किती संवेदनशील होते याचे मुर्तीमंत उदाहरण होते. घटना समितीचे सदस्य,भारताचे पहिले कृषिमंत्री,सहकारमंत्री, अशा विविध पदावर भरीव योगदान देणारे कृषि विद्यापीठाचे जनक, कृषिरत्न,शेतकयांचे कैवारी, शिक्षणमहर्षी डाॕ.पंजाबराव देशमुख यांनी देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या भारत मातेच्या या सुपुत्राने १० एप्रिल १९६५ ला खेरचा श्वास घेतला. असे सांगून त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिदन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन कु.परी शेळके हिने केले तर आभार कु.श्रावणी रामटेके हिने मानले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक धनराज रेवतकर विज्ञान शिक्षक यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी सौ.रेखा थुटे,संतोष धोटे,शिरीष मोहबे,वैशाली गायकवाड स.शिक्षक यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close