तंटामुक्त समिती ने लावला प्रेमी युगलाचा विवाह

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
मौजा भंडारा येथील प्रेमी युगलाचा तंटामुक्त समिती नेरी ने रितीरिवाजा नुसार विवाह लावला.
मौजा भंडारा येथील जयेश प्रकाश निमजे (वय 29 वर्षे जात हलवा) व सुनिता ताराचंद निरगुडकर (वय 27 वर्ष जात तेली )यांचे एकमेकावर प्रेम जडले आणि त्यांनी लग्न करण्याचा विचार केला त्यासंदर्भात तंटामुक्त समितीकडे रीतसर अर्ज व कागदपत्रे देऊन विवाह लावून देण्याची विनंती केली त्यानुसार तंटामुक्त समिती अध्यक्ष व सदस्य यांनी कागदपत्रांची पडताळणी करून जयेश प्रकाश निमजे व सुनिता ताराचंद निरगुडकर यांचे मागील दोन वर्षापासून एकमेकावर जीवापाड प्रेम असल्यामुळे आणि घरच्यांचा या विवाहाला विरोध असल्यामुळे रिती रिवाजानुसार लग्न लावून दिले. यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष हरिदास चांदेकर, ग्रामपंचायतीचे उपसरपंच चंद्रभान कामडी, माजी पोलीस पाटील शंकर पिसे, सत्यभामा कामडी, गंगाबाई कामडी, माणिक नगराळे, रुस्तम खा पठाण, ग्रामपंचायत सदस्य पिंटू खाटीक, चंद्रशेखर बोकडे, भारती बोकडे, मोरेश्वर बोकडे, माजी सरपंच मोरेश्वर श्रीरामे, पंकज वाकमोडे, पत्रकार रामचंद्र कामडी तसेच मेरी ग्रामपंचायत समस्त कर्मचारी आणि गावकरी उपस्थित होते.