कंगणा रानावतवर गुन्हा दाखल करा मनविसे चे प्रशांत जुंजारे यांचे उपविभागीय पोलीस अधिक्षक वरोरा यांना निवेदन

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी लोकं कुठल्याही थराला जातात. असेच नेहमी वाद ओढवून घेणारी तथाकथित अभिनेत्री कंगना रानावतनेही बेताल वक्तव्य केलं ज्यात ती मनते की “१९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र हे भीक आहे, खरं स्वातंत्र २०१४ ला मिळालं.” अश्याप्रकारचे विधान करणे म्हणजे आपल्या स्वातंत्रलढ्यात बलीदान केलेल्या सर्व स्वातंत्रवीरांचा अपमान आहे जे मनसे खपवून घेणार नाही. त्यात अश्या व्यक्तीजवळ पद्मश्री सारखा उच्च पुरस्कार असणे सुद्धा चुकीचे आहे.शासनाने पद्मश्री पुरस्कार वापस घ्यावा.महाराष्ट्र नवनिर्माण सेना या कृत्याचा निषेध करून कंगना रानावतचा पदमश्री पुरस्कार परत घ्यावा आणि योग्य ती शिक्षा करण्यात यावी जेणेकरून यानंतर कोणीही आपल्या इतिहासाचा अनादर करण्यास धजावणार नाही. असेही निवेदनात नमूद केले आहे.यावेळी आकाश काकडे,साजीद पठाण उपस्थित होते.
