अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद विदर्भ युवा अध्यक्षपदी राहुल मसराम यांची नियुक्ती
उपसंपादक:विशाल इन्दोरकर
नागपूर: अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली या राष्ट्रीय पातळीवरील आदिवासी समाजाच्या घटनात्मक अधिकारासाठी लढणाऱ्या सामाजिक संघटनेच्या विदर्भ युवा अध्यक्षपदी भिवापूर पंचायत समिती सदस्य,युवा सामाजिक नेतृत्व राहुल मसराम यांची नियुक्ती अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.लकी जाधव यांनी केली.आपल्या नियुक्ती बद्दल बोलताना राहुल मसराम यांनी राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र जी मोघे,प्रदेश अध्यक्ष लकी जाधव,प्रदेश उपाध्यक्ष दिनेश शेराम व माजी विदर्भ अध्यक्ष चंद्रशेखर मडावी यांचे आभार व्यक्त करून विदर्भात आदिवासी युवक युवतींचे मजबूत संघटन तयार करून वंचित आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असे मनोगत व्यक्त केले.राहुल मसराम यांच्या विदर्भ अध्यक्षपदी नियुक्ती मुळे आदिवासी युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले त्यांच्या नियुक्ती बद्दल सुनील ढाले,महिपाल मडावी,शुभम आत्राम संतोष आत्राम,स्वप्नील मसराम,विजय परतेकी,राहुल मडावी,सुरेंद्र नैताम,ओम येटे,नयन गेडाम, अमन बोरे,प्रशांत मडावी, साहिल मडावी,विनय उईके,विनोद व ट्टी,सचिन नराते,अतुल कोडापे आदींनी आनंद व्यक्त केला.