तिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय सेलची विशेष सभा संपन्न

प्रतिनिधी: संजय नागदेवे तिरोडा
तिरोडा- तालुका अध्यक्ष मा. किरणजी बन्सोड यांच्याद्वारे आयोजित तिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय सेलची विशेष सभा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष मा. मनोजजी डोंगरे, जिल्हा महिला अध्यक्ष मा. राजलक्ष्मीताई तुरकर, व युवा नेता रविकांत(गुड्डू) बोपचे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व सामाजिक न्याय सेलद्वारे करण्यात येत असलेल्या कामांची माहिती देण्यात आली. तालुकापातळीवर सामाजिक न्याय विभाग समितीला अधिक बळकट करणे, गावपातळीवर अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, एन टी. घटकांतील नागरिकांपर्यंत पक्षाची विचारधारा पोचविण्याचे कार्य करावे. जेणेकरून समाजातील नागरिक पक्षाशी बळकटीने जोडले जातील व पक्ष बळकट होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गरीब, शोषित, वंचित समाजाच्या न्याय हक्कासाठी नेहमी झटत असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी अग्रेसर आहे हे पटवून देण्यात यावे.असे प्रतिपादन यावेळी उपस्थित मान्यवरांकडून करण्यात आले. सदर सभेत श्री राजेश्वर बोरकर उपाध्यक्ष(सुकडी क्षेत्र), राकेश सोयम उपाध्यक्ष(सरांडी क्षेत्र), विनोदजी डोंगरे तालुका सदस्य(मुरमाडी), आदेश मेश्राम तालुका सदस्य(नवेगाव) अजित ठवरे(धा दरी) तालुका सचिव ,बुद्धभूषण खोब्रागडे (तालुका सदस्य) ज्योती चंद्रशेखर मडावी (तालुका महिला सचिव, धनराजजी नंदगये तालुका सदस्य, नरेशजी जंगले (तालुका सहसचिव) यांची तालुका सामाजिक न्याय विभागा अंतर्गत सदस्यांची नवनियुक्ती करण्यात आली. यावेळी सर्वश्री सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष मा. मनोजभाऊ डोंगरे, जिल्हा महिला अध्यक्ष मा. राजलक्ष्मीताई तुरकर, तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे युवा नेते मा. रविकांत(गुड्डू) बोपचे,तालुका अध्यक्ष प्रेमकुमारजी रहांगडाले, जि.प. सदस्य मा. कैलासजी पटले, माजी नगराअध्यक्ष तिरोडा मा. अजयजी गौर, माजी उपसभापती मा. किशोरभाऊ पारधी,सा. न्याय विभाग अध्यक्ष मा.किरणजी बन्सोड, मा. बाबुरावजी डोमळे वरीष्ठ कार्यकर्ता, मा. बोधानंदजी गुरुजी सामाजिक कार्यकर्ते, मा. युवराजजी शहारे सा. न्याय सेल, मा. बबनजी कुकडे, मा.मोरध्वजजी बोरकर, मा. किशोरजी कुंभारे मा. स्वप्निल सतिसेवक, मा. मचिंद्र टेम्भेकर, मा. जितेश बोदेले, शुभम वासनिक, विनोद मरसकोल्हे, मुकेश पगरवार, अशोक इंदुलकर, गणराज बिसेन,आदीसह सेलचे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.









