आजच्या स्त्रियांनी क्रांतीज्योती सावित्रींनी दिलेला मुलमंत्र अंगिकारावे डाॕ. अभिलाषा गावतुरे


ग्रामीण प्रतिनिधी:महेश शेंडे विठ्ठलवाडा
पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रिया पुरुषांवर अवलंबून असल्याने त्यांना स्वतःचा निर्णय घेण्याचा फारसा अधिकार नाही. त्यामुळे आजही त्यांचे स्थान नगण्यच असल्याने त्यांच्यावर अन्याय, अत्याचार होताना दिसतो. आधुनिक काळात त्यांना राजकीय, प्रशासकीय व व्यवस्थापन क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने संधी मिळाली पाहिजे, तरच त्यांचा आर्थिक दर्जा सुधारेल व राष्ट्राच्या प्रगतीत त्यांचे योगदान वाढेल.असे आवाहन डाॕ.अभिलाषा गावतुरे यांनी केले.ओबीसी कृती समिती तालुका गोंडपिंपरी द्वारा आयोजित भव्य महिला मेळावा व समाज प्रबोधन परिषद कार्यक्रमात बोलत होते.प्रत्येक स्त्रियांनी आपली मानसिक गुलामगिरी झिटकारून पुढे यावे असे आवाहन केले.ओबिसी परिषदेचे अध्यक्ष तथा आरक्षण विश्लेषक प्रा.श्रावण देवरे यांनी ओबिसी जातनिहाय जनगनणा न होण्यास ओबिसी नेते जबाबदार असल्याची खंत व्यक्त केली.या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण प्रा.नितेश कराडे फिनिक्स अॕकाडमी वर्धा होते.कराडे सरांनी ग्रामीण भागातील तरूणांनी सत्ताधारी व्हावे असे आवाहन आपल्या बोलीभाषेतून पटवून दिले. महिला मेळाव्याचे उद्घाटन डॉ. मृणाल अलोने यांनी केले.सहउद्घाटक अर्चना श्रीखंडे होते. अध्यक्षस्थानी सौ.मालाताई खर्डीवार, स्वागताध्यक्ष सौ,मनीषा पेंदर आणि या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सौ,सपना साखलवार,सौ, रेखा कारेकर, सौ.दमयंती वाकडे, किरण माकोडे, रेखा रामटेके,सौ. मंगला पालकृतीवार, स्मिता बांगडे, सौ.उषाताई झाडे होते.या कार्यक्रमाचे प्रास्तविक सौ.अरूणा जांभुळकर यांनी केले.सुत्रसंचलन सौ.प्रमिला हांडे तर आभार सौ.कोमल फरकडे यांनी मानले.महिला मेळाव्याच्या यशस्वितेसाठी ओबिसी महिला मंचच्या सखींनी सहकार्य केले.