ताज्या घडामोडी
अल्पभूधारक प्रमाणपत्र मिळण्यास लोकांना नाहक त्रास
ग्रामीण प्रतिनिधी:देवानंद तुरानकर खेमजई वरोरा
वरोरा येथे अल्प भूधारक प्रमाणपत्र मिळण्यास लोकांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागतो.वरोरा येथील तहसील मध्ये अल्पभूधारक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ये जा करावे लागते. तसेच बीपीएल प्रमाणपत्र काढण्यासाठी लोकांना पंचायत समिती येथे ये जाणे करावे लागत होते. त्या नंतर मा. आमदार सौ. प्रतिभा बाळूभाऊ धानोरकर यांनी पंचायत समिती येथे बीपीएल प्रमाणपत्रासाठी ये-जा करावी लागत होती ती बंद करून ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध करून दिले. त्याप्रमाणेच तलाठी यांना अधिकार देऊन अल्प भूधारक प्रमाणपत्र गाव पातळीवर उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.