लाडकी बहीण’ योजने ऐवजी सुरक्षित बहीण’ योजना आना
गेल्या दहा वर्षात दलीत, आदिवाशी आणि महिला अत्याचार शंभर पटीने वाढले-डॉ.जितीन वंजारे.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
1)गेल्या दहा वर्षात महिला, आदिवासी, दलीत अत्याचारच्या घटनात शंभर पटीने वाढ़ तरीही येथील गृहमंत्री गाढ झोपेत.
2)अत्याचाराचे चिंताजनक भयानक वास्तव लिहिणाऱ्या आणि दाखवणाऱ्या पत्रकारांवर हल्ले, गुन्हे दाखल होत आहेत त्यांना धमक्या दिल्या जातं आहेत. पोलीस यंत्रणा बघ्याची भूमिका घेत आहे, पूर्णपणे राजकीय दबावाखाली काम करत आहे.
3)महिला, दलीत आणि आदिवासी अत्याचाराच्या गुन्ह्यात लवकर एफ आय आर दाखल होत नाही, राजकीय दबाव वापरल्याचे उघड,तरीही न्याय व्यवस्था डोळेझाक करत आहे.
4)पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणात माणूस बघून कार्यवाहीस दिरंगाई हे उघड झालं जेंव्हा शोशल मिडीयावर थू थू झाली तेंव्हा गुन्हा दाखल झाला याचा सरळ अर्थ माणूस बघून पोलीस यंत्रणा गुन्हे दाखल करते कि काय?पोलिसांनी भेदभाव करू नये.
5)बदलापूर अत्याचार प्रकरणात दोन दिवसांनी गुन्हा दाखल झाला बावीस तास पोलीस स्टेशनं मध्ये बसवून ठेवलं आरोपीला सोडून गुन्हा दाखल करण्यास आलेल्या कुटुंबियांना यंत्रनेनी त्रास दिला याला जबाबदार कोण?अखेर चिमूकलीचा मृत्यू झाला, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा संबंधित पोलिसांवर दाखल करा,त्यांना बडतर्फ करा
6)गरिबांच्या,दलितांच्या, आदिवासीय महिला यांच्या अत्याचाराच्या घटना खुपच सोपस्करपणे दाबल्या जातात. मोठ्या उच्चभ्रू,राजकीय व्यक्तींच्या वरदहस्ताने च हे घडत असल्याचे स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले.
7)मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी नैतिकता पाळून बदलापूर चिमुकलीवर अत्याचार प्रकरणात तिचा जीव गेल्यामुळे राजीनामा द्यावा, खुर्च्या न्याय देण्यास असमर्थ असतील तर खाली करा, हा नैतिक महाराष्ट्र आहे बिहार नाही, यंत्रनेवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा, संबंधित पोलीस कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करून त्यांना बडतर्फ करा
काल-परवा बदलापूर येथील अत्याचाराची घटना पाहून मन सुन्न झालं एका नाराधमाणे शाळेच्या कोपऱ्यात दोन लहान मुलीवर अत्याचार अति प्रसंग केला जेंव्हा तिने तिच्या आईला सांगितले कि आई लघवी करताना आग होत आहे तेंव्हा डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर प्रकरण उघडकीस आले. प्रकरण इतके गंभीर असूनही गुन्हा दाखल करवून घेतला नाही उलट नातेवाईकांना पोलीस स्टेशन मध्येच बावीस तास बसवून ठेवले. त्यांनाच हाणमार झाली, अपमानस्पद वागणूक त्यांना दिली, सिसिटीव्ही फुटेज गायब केले. दोन दिवस उलटूनही गुन्हा दाखल झाला नाही अखेर त्या चिमुकलीचा जीव गेला.वारे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री.अरे महाराष्ट्र आहे कि बिहार, वामन म्हात्रे एक नेता आहे तो पत्रकाराणा डायरेकट धमकावतो आहे,म्हणतो बातम्या अश्या करते कि जणू तुझाच रेप झाला आहे? अरे किती भडवे गिरीची ही भाषा? किती सत्तेचा माज?दिवसा ढवळ्या पत्रकाराणा धमकावले जातं आहे. आवाज उठवायचा कसा? कोणी? आणि कुठे? लोकशाही जिवंत आहे कि नाही? आमचा केंद्राचा आणि राज्याचा गृहमंत्री संपूर्ण झोपेत आहे.मुख्यमंत्री फक्त वोट जमावण्याच्या नादात आहेत, इकडे दलीत अत्याचार प्रकरणात एफ आय आर नोंद होत नाही.गुन्हेगाराला पाठीशी घालत आहेत. आदिवासी्याची घरे उध्वस्त करून बाबा रामदेव, अडाणी,अंबानी च्या घश्यात जंगले जमीन घातली हे महापाप कुठे फेडसाल. गोर गरीब जनतेच्या घरांवर जेसीबी चालवून हजारो संसार उध्वस्त केले, जंगले उध्वस्त केली, पर्यावरणाला धोका देऊन त्या ठिकाणी सिमेंट ची जंगले उभा करून निसर्गाचा घात करणाऱ्या नालायक हातामध्ये देश सुरक्षित नाही तर ही पवित्र भारत भूमी असुरक्षित आहे. यावर तुम्ही आम्ही बोललं पाहिजे. मा. सुप्रीम कोर्टाने जबर दखल घेऊन यावर कार्यवाही केलीच पाहिजे. सुरक्षा यंत्रणा, पोलीस,निवडणूक आयोग,सरकारी अधिकारी,तपासणी संस्था ताब्यात घेऊन सरकार मनमानी करून वाटेल त्याला विरोधात बोललं कि तुरुंगात डांबत आहे ही लोकशाहीला काळिमा फसणारी गोष्ट आहे.हे तात्काल बंद करा. येथील नागरिकांचा उद्रेक झाल्यास जिवंत सरकारला जाळण्याची ताकत येथील नागरिकांत आहे.मूठभर राशन देऊन गुलाम केलेली जनता जेंव्हा ही विकासाचं गाजर उपटून टाकेल ना तेंव्हा पळता भुई कमी पडेल.जर तुमच्या सरकार काळात मेल्यावरच न्याय मिळणार असेल, तुमचे जवळचे गुंड च अत्याचार अन्याय करणार असतील, तर तसंही सांगा याचा उद्रेक आज ना उद्या होईल आणि महिला खेळाडूंवर झालेले अन्याय अत्याचार विरोधात लढायला आदिवासी,दलीत आणि महिला सक्षम आहेत तुम्हाला धडा शिकवायला. गृहमंत्री प्रत्येक घटनेत विडिओ व्हायरल झाल्यावरच गुन्हा दाखल करणार असेल तर सरळ सरळ राजीनामा द्या, तुम्ही न्याय देण्याच्या लायकीचे नाहीत. ती बदलापूर शाळा अत्याचार प्रकरनातील चिमुकली मरण पावली आणि मुख्यमंत्री महोदय म्हणतात हे राजकीय विरोधकांच आंदोलन आहे,अरे लाज वाटती तुमची? इतके असंवेदनशील आहात तुम्ही? हेच तुमच्या नातीच्या बहिणीच्या किंवा मुलीच्या बाबतीत झालं असत तर काय केल असत?याला राजकीय रुतो देऊन प्रकरण दाबले असतें काय?या प्रकारणांची गंभीरता लक्षात घेऊन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी नैतिकता पाळून राजीनामा द्यावा असे स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते तथा दलीत नेते मा. सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले.
बदलापूर येथील घटना निर्दयी, अमानवीय, हैवानीय असून ती निषेधार्थ आहेच असं असूनही दोन दिवसानंतरही गुन्हा दाखल न करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना तात्काल बडतर्फ करा, एफ आय आर दाखल न करणाऱ्याना ही गुन्ह्याचे गुन्हेगार करून त्याच्यावर खटला चालवा,चिमुकली मरण पावली आहे त्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पोलीस कर्मचारी यांच्यावर दाखल करा.आमच्या पोरी बाळी, आया बहिणी रस्त्यावर पडल्या नाहीत त्यांना सुरक्षा द्या त्यांना दीड हजार देण्यापेक्षा लाडकी बहीण योजना आणण्यापेक्षा ‘सुरक्षित बहीण’ योजना आना आणि आमच्या आया बहिणींना संरक्षण द्या अशी कळकळीची विनंती सामाजिक कार्यकर्ते तथा दलीत नेते डॉ.जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी मुख्यमंत्री गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.