ताज्या घडामोडी

प्रेमात गुरफटंलेल्या प्रेमी युगुलांचा पार पडला आदर्श गावात प्रेमविवाह

दोघांनीही सुखाने संसार करण्याची घेतली शपथ

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

गेल्या काही दिवसांपासून प्रेमात गुरफटलेल्या प्रेमी युगुलांचा विवाह चंदनखेडा तंटामुक्ती समितीच्या पुढाकाराने पार पडला असल्याचे वृत्त आहे. चारगाव येथील सुरेंद्र विश्वनाथ आडे ह्या 24 वर्षिय प्रियकराचे अतुट प्रेम त्याच गावातील मुळ रहीवाशी असलेल्या सपना अशोक मेश्राम हिच्याशी होते .दरम्यान आजच्या घडीला या प्रेमकहाणीतील प्रेयसीचे वय 19 वर्षाचे असल्याचे समजते.भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीकडे या प्रेमविरांनी विवाहबध्द होण्यासाठी अर्ज सादर केला व प्रेमविवाह लावून देण्याची विनंती केली.
१५ डिसेंबर २०२३ ला स्थानिक महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते यांनी दोघांच्याही कागदपत्रांची छानबिन केली . त्या नंतर गावातील विठ्ठल रुक्मिणी देवस्थानात पंचासमक्ष त्यांनी ह्या दोघांचा विवाह लावून दिला.
सदरहु विवाह प्रसंगी भद्रावती तालुक्यात आदर्श गांव म्हणून ओळख असणाऱ्या चंदनखेडा येथील प्रभाकर दोडके, दिलिप कुळसंगे, सुशिला हनवते, गांवचे पोलिस पाटील समिरखान पठाण, तंटामुक्त समितीचे सदस्य छाया घुगरे,बशीर शेख, लोकेश कोकुडे,अमर बागेसर,कदिर पठाण, प्रज्वल बोढे, मयुर नन्नावरे,विजय खडसंग, प्रफुल्ल निकोडे, शंकर दडमल, राहुल कोसुरकार,आशिष हनवते आदिं मंडळी उपस्थित होती . दोघांनीही (विवाहबध्द झालेल्या प्रेमविरांनी)साक्षीदारांसमक्ष ‌सुखाने संसार करण्याची शपथ घेतली .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close