रेखा मनेरे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
जिल्हा प्रतिनिधीःअहमद अन्सारी परभणी
दिनांक 17/09/2023 रोजी लातूर येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या परभणी महिला जिल्हा अध्यक्षा मा. सौ. रेखाताई मनेरे यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स हुमन राईटस मिशनच्या वतीने शहिद चंद्रशेखर आझाद राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविन्यात आले लातूर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम लढयातील स्वातंञ सैनिकांचा, विर माता – पिता व संघटनेचे पदधिकारी यांचा सत्कार समारंभ आयोजित करन्यात आला होता.
त्यावेळी अखील भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रदिप पाटील – खंडापुरकर यांनी सौ. रेखाताई मनेरे यांचे सामाजिक कार्य लक्षात घेऊन त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी राष्ट्रीय महिला अध्यक्षा डाँ. कविता राजदाया, प्रदेश अध्यक्ष मा. पंडित तिडके, प्रदेश अध्यक्षा राणी ताई स्वामी, नाशिक जिल्हा अध्यक्ष सना शेख, हितेश दाभाडे, शिवकुमार काळे उपस्थित होते अशा प्रकारे लातुर येथील कार्यक्रमात शहिद चंद्रशेखर आझाद राज्यस्तरीय पुरस्काराने रेखा मनेरे यांना सन्मानित केल्या बद्ल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन व कौतुक होत आहे.