ताज्या घडामोडी

काजळसर-मोठेगाव बीटाचे वनरक्षक श्रीकृष्ण नागरे यांची अखेर बदली

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी

नेरी येथून जवळ असलेल्या काजळसर-मोठेगाव बीटातील वनरक्षक श्रीकृष्ण नागरे यांच्यावर कर्तव्यात कुचराई करण्याचा ठपका ठेवत त्यांची तडकाफडकी बदली करून विभागीय चौकशी करण्याची मागणीसामाजिक युवा कार्यकर्ता अजित सुकारे यांनी वनविभागाकडे केली होती.
या तक्रारीची तात्काळ दखल घेत
तडकाफडकी बदली करण्यात आली आणि नवीन वनरक्षक म्हणून काजळ-सर मोठेगाव बीटाचे वनरक्षक प्रधान यांनी पदभार स्वीकारून कर्तव्यावर रुजू झाले.
तळोधी वनपरिक्षेत्र अंतर्गत नेरी उपक्षेत्रातील काजळसर-मोठेगाव बीटात गेल्या 3 वर्षापासून वनरक्षक श्रीकृष्ण नागरे कार्यरत होते.राज्य योजना अंतर्गत वनीकरण भरगच्च कार्यक्रम या योजनेमार्फत गोरवट येथे 2019 मध्ये कक्ष क्रमांक:1807या क्षेत्रात पाच हेक्टर मध्ये सागाची लागवड करण्यात आली.
मात्र 40 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक काम न करता शासकीय निधीचा अपहार केला.त्यांची गावातील लोकांसोबत उद्धट भाषेत बोलून शिवीगाळ करणे, अशा त्यांच्या असभ्य वर्तणूकीमुळे व त्यांच्या नोकरीच्या कामात हलगर्जीपणा आढळून येत असल्याचे
तसेच वनरक्षकाच्या बीटांमध्ये अवैध वृक्षतोड गौण खनिज उत्खनन झालेले आहे.
शेत शिवारात वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्याकरता आर्थिक देवाण-घेवाण करणे,व मर्जीतल्या लोकांशी हितसंबंध साधून त्यांना वहिवाटीसाठी वनअधिकारातल्या जमिनी प्रदान करणे,
असे अनेक आरोप नागरे वनरक्षक यांच्यावर केले आहेत .
आणि याचा गावकऱ्यांनी निषेध सुद्धा व्यक्त केलेला होता तसेच नागरे हे नोकरीवर रुजू झाले तेव्हापासून त्यांची वागणूक गावकरी यांच्या विरोधात्मक आढळून आलेली होती.
सामाजिक कार्यकर्ते
अजित सुकारे व
मोटेगाव येथील ग्रामवाशी
यांच्या तक्रारीची दखल घेत वनविभागाने वनरक्षक श्रीकृष्ण नागरे यांची तडकाफडकी बदली करून चौकशी लावली व त्यात ते कसूरवार आढळून आल्याचे बोलले जात असल्याने सदर वनरक्षक विरोधात विभागीय चौकशी सुरूच असून पुढे कुठली कार्यवाही होणार व चौकशीत काय निष्पन्न होणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
सदर प्रकरणी वन विभागाने वनरक्षकाची तडकाफडकी बदली केली आहे.

प्रतिक्रिया…
राज्ययोजना अंतर्गत वनीकरण भरगच्च कार्यक्रम या योजनेमार्फत रोप वनाचे नाव: साग,
मौजा गोरवट कामाचे वर्ष 2019 स्थळ क्रमांक: 1807 कार्यक्रमाचे क्षेत्र 05 हेक्टर मध्ये सागाची लागवड केली असता तेथे प्रत्यक्षात 40 टक्के झाडे जिवंत राहिलेली नाही.
त्याकरिता सर्वस्वी जबाबदार म्हणून बीट क्षेत्र अधिकारी म्हणून नागरे, वनरक्षकच आहेत..
सदर योजनेची
माहिती अधिकारातून माहिती मागितली असता खूप मोठा भ्रष्टाचार व आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास येत आहे सदर प्रकरणी तात्काळ चौकशी होऊन दोषी वरिष्ठअधिकाऱ्यांनवर सुद्धा कार्यवाही करून
वनरक्षक यांना बडतर्फ करण्यात यावे.

अजित सुकारे मोठेगाव
सामाजिक कार्यकर्ते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close