राष्ट्रीय मूल्यमापन आणि मान्यता परिषदेची स्व नितीन महाविद्यालयाला भेट

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी येथील सत्यम् शिवम् सुंदरम् शिक्षण प्रसारक मंडळ,परभणी संचलित स्व नितीन महाविद्यालयाचे मुल्यांकन करण्या साठी राष्ट्रीय मूल्यमापन आणि मान्यता परिषदेचे सदस्य (नॅक) सात आणि आठ मार्च २०२३ रोजी भेट देणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ आर एस फुन्ने, आयक्यूएसीचे संचालक प्रा डॉ भारत निर्वळ यांनी दिली.
स्व नितीन महाविद्यालयाच्या स्थापनेला जवळपास पंचविस वर्ष झाले असून माजी आ हरिभाऊ लहाने हे या महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष आहेत तर कुनालराव लहाने हे सचिव म्हणून काम करतात. हे महाविद्यालय उच्च शिक्षणा सोबतच सामाजिक कार्यात ही सदैव अग्रभागी राहिले आहे अशी माहिती या वेळी प्राचार्य डॉ आर एस फुन्ने यांनी दिली.
स्व नितीन महाविद्यालय हे प्रथमच नॅक ला सामोरे जात आहे.या साठीची संपुर्ण तयारी झाली असून २७ फेब्रुवारी २०२३ रोजी श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथील प्राचार्यांची समिती पुर्वतयारीची पहाणी करणार असल्याचे प्राचार्य डॉ फुन्ने यांनी सांगितले.
राष्ट्रीय मूल्यांकन समिती महाविद्यालयाच्या विविध विभागांची पहाणी करणार आहे त्यात , कार्यालय ग्रंथालय , क्रिडा या सोबतच विषय निहाय सर्व विभागांसह शैक्षणिक आणि भौतिक सुविधांचे मुल्यांकन, आजीमाजी विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधणार आहेत एकूनच या महाविद्यालयाचे अंतर्गत आणि बाह्य असे दोन्ही अंगांनी मूल्यमापण होणार आहे. या मूल्यांकणाला सामोरे जाण्या साठी लागणारी सर्वोतोपरी मदत सचिव कुनालराव लहाने यांनी केल्याचे प्राचार्य डॉ आर एस फुन्ने यांनी सांगितले.