मराठा आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष सुभाष दादा जवळे चे उपोषण सुरूच
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
गेल्या सात दिवसापासून मराठा आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष सुभाष दादा जवळे चे उपोषण सुरूच आहे
हे प्राणांकित आमरण उपोषण परभणी येथे करत आहेत परंतु त्यांनी मागणी केलेल्या मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत डब्ल्यू एच आरक्षण मराठा समाजासपूर्वक चालू करावे व इतर मागण्यांसाठी सरकारकडे वेळ नाही म्हणून आज सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले व त्यांनी दोन तास राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला यावेळी मराठा आरक्षणाची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी यांच्यासोबत मराठा आंदोलन कार्यकर्त्यांची बाचाबाची ही यावेळी झाली आंदोलनकर्ते पोलीस प्रशासनाचे ऐकण्यास तयार नव्हते शेवटी सुभाष दादा जावळे यांच्या विनंतीवरून सर्व आंदोलक यांनी शासनाला दोन दिवसाचा वेळ दिला आहे जर दोन दिवसात शासनाचे शिष्टमंडळ मागण्यांसंदर्भात शब्द दिला नाही तर येणाऱ्या परिस्थितीस आंदोलन करते जबाबदार नाहीत.