ताज्या घडामोडी

प्रणिता कांबळेंना सामाजिक व प्रशासकीय कार्यगौरव पुरस्कार जाहीर

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

बीड राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ आणि श्रावस्ती सामाजिक, शैक्षणिक, संशोधन प्रतिष्ठान परळी वैजनाथ यांच्या वतीने सामाजिक,शैक्षणिक, पत्रकारिता अश्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य
करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो. या पुस्कारांमध्ये या पूर्वी अनेक पुरस्कारप्राप्त झालेल्या
बार्टी सोलापूरच्या प्रकल्प अधिकारी प्रणिता कांबळे यांना सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सामाजिक, प्रशासकीय कार्य गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. सोलापूर
जिल्ह्यातील असणा-या प्रणिता कांबळे यांना राज्यस्तरीय सामाजिक कार्य गौरव पुरस्कार
जाहीर झाल्याची माहिती पुरस्कार समितीचे अध्यक्ष संतोष जाधव यांनी दिली.यापूर्वी देखिल त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. विविध वृत्तपत्रात त्यांनी विपूल लेखन केले आहे. त्यांचा अनेक कार्यात व उपक्रमात सहभाग राहिला आहे.प्रणिता कांबळे यांना या वर्षात अनेक पुरस्काराने सन्मानीत
करण्यात आले आहे, त्यात राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराचा समावेश आहे.
प्रणिता कांबळे ह्या बार्टीच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवित असतात. त्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो.
दरम्यान त्यांना राज्यस्तरीय सामाजिक, प्रशसकीय
कार्य पुरस्कार सन्मान जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

प्रणिता कांबळे यांचे विविध कार्य व पुरस्कार

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ड्रीम फौंडेशन व चाणक्य
गुरुकूल यांच्या कडून ड्रीम युवा पुरस्कार २०१९.
त्रिशरण एनलाइन्टमेंट फौंडेशनकडून महात्मा फुलेचा वारस पुरस्कार २०२०.
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्ष निमित्त सन्मानचिन्ह देऊन
गौरव. भिम कन्या कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त –
भिम कन्या पुरस्कार २०२१. महिला दिनानिमित्त फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया कडून पद्मश्री अवाबाई वाडिया
कर्तृत्व शालिनी पुरस्कार २०२२.राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त युवा प्रेरणा पुरस्कार – २०२२.राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष प्रणितीताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा प्रेरणा पुरस्कार २०२२. पुरोगामी विचारांचे निर्भिड व रोखठोक मत मांडणारे एकमेव न्युज चॅनल पुरोगामी महाराष्ट्र या
न्युज चॅनेलच्या वतीने राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श प्रकल्प अधिकारी पुरस्कार १ मे २०२३.मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन, भारत यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रत्न पुरस्काराने सन्मानीत ३१ मे २०२३. गरजू व गरीब महिला व पुरुषांना शिलाई मशिनचे मोफत कोर्सेस त्यांनी उपलब्ध करुन दिले. सोलापूर शहरामध्ये लेप्रसी सर्वेमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. कोरोना काळात गरीब, गरजू लोकांना घरोघरी जाऊन अन्नधान्य वाटप केले. कोरोना काळात प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन गरिबांना अर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचे वितरण केले.
अपंगांसाठी मोफत आर्टिफिशल पाय व कुबडीचे वाटप केले त्यांनी केले आहे.
बालकामगार मुलां व मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम .किशोरी मुलींसाठी शिक्षणासाठी काम केले आहे.
युवा गट कामकाजए प्रौढवर्ग चालविले आहेत. वस्ती पातळीवर मोफत आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन केल्या जाते. विधवा, परितक्त्या, कलाकार, अपंग यांचा सर्वे केला आणि त्यांना शासकिय मदत मिळवून दिली. महिलांना मेनबत्ती उद्योग उभारणी साठी मदत केली. ‌ दादासाहेब योजना कामकाज, शिष्यवृत्ती वर कामकाज, अॅट्रोसिटी कार्यशाळा, माहिती अधिकार
कार्यशाळा, स्वाधार कामकाज, रेशिम अभियान कामकाज त्या करत आहे.दरवर्षी संविधान आधारित एक महिना प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. MPSC, UPSC, Banking, पोलिस भर्ती पूर्व प्रशिक्षण, मिलीटरी पूर्व प्रशिक्षण, कौशल्य
विकास कार्यक्रम, RTO सर्वेक्षण, IBPS सेंटर कोर्स, PHD मार्गदर्शन, दुष्काळ ग्रस्त शेतकरी सर्वेक्षण, गटई कामगारांना टॉल मिळवून देणे आदी त्यांचे कार्य सूरु आहेत. मिनी टॅक्टर बचात गटांना मिळवून दिले आहेत. डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त दुर्मिळ फोटोंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. विद्यार्थांच्या बुध्दीला चालना मिळावी म्हणून दरवर्षी संविधान आधारित व वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन त्यांनी केले.
सामाजिक न्यायविभाग येथील महामंडळांतील ६ महामंडळांना लाभार्थी मिळवून दिले.
बालकामगार मुलांना शिक्षण च्या प्रवाहात आणण्यासाठी 2013ते 2017 पर्यंत कामकाज केले आणि मुलांना शिक्षणच्या मुख्य प्रवाहत आणले.जातपडताळणी शिबीर घेणे आदीं भरीव कार्य प्रणिता कांबळे यांनी केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close