ताज्या घडामोडी

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावा- चाऊस

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील एका पेक्षा जास्त विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक कर्ज मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. आता एकाच कुटुंबातील एका पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना साडेसात लाख रुपयापर्यंत शैक्षणिक कर्ज घेता येईल.अशी माहिती अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली होती. यानंतर यायोजनेचा पुरेपूर लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. असे आवाहन मौलाना आझाद युवा मंच चे जिल्हा अध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी केले आहे.
मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख,पारशी आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळावी.यासाठी मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाकडून शैक्षणिक कर्ज योजना राबविली जात आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त निगम नवी दिल्ली यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत सध्या एकाच कुटुंबातील एका पेक्षा जास्त विद्यार्थ्याकरिता पाच लाख रुपये कर्ज मर्यादा आहे.म्हणून आता त्याची मर्यादा वाढवून साडेसात लाख रुपये इतकी करण्यात आल्याची माहिती ना. मलिक पटेल यांच्या वतीने देण्यात आली होती.
हीच माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे माजलगाव तालुक्यातील बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्याकरिता नुमान अली चाऊस यांनी दिली आहे. पुढे त्यांच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की, मौलाना आझादमहामंडळाच्या भाग भांडवलातही राज्य शासनाने आता ७०० कोटी रुपयांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कर्ज योजना साठी पुरेसा निधी उपलब्ध होत आहे या पुढील काळातही महामंडळाच्या विविध योजनांसाठी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत संपूर्ण प्रोत्साहन देण्यात येईल. म्हणून सर्वच अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा.अथवा योजनेबद्दल विस्तृत माहिती घेण्यासाठी 9766627986 या मोबाईल वर संपर्क साधावा असे आवाहन मौलाना आझाद युवा मंच चे जिल्हा अध्यक्ष नुमान अली चाऊस यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close