परमपूज्य श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे गुढीपाडवा उत्सव उत्साहात साजरा
जिला प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
श्रीसाई स्मारक समिती पाथरीच्या वतीने श्री साईबाबांचे जन्मस्थान मंदिर पाथरी येथे शनिवार दिनांक 2 एप्रिल 2022 रोजी पहाटे ५:१५ वाजता श्री साईबाबांची काकड आरती झाली नंतर साईबाबांना मंगल स्नान घालण्यात आले त्यानंतर ॲड श्री अतुल दी. चौधरी यांचे शुभहस्ते गुढीचे पूजन करून श्रीसाईबाबांच्या मंदिराच्या शिखरावर गुढी उभारण्यात आली. पूजेचे पौराहित्य वे.शा.सं. उमेश गुरू जोशी सावरगावकर यांनी केले. प्रसंगी समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ना.के. कुलकर्णी, मंदिर प्रमुख सौ.छाया ना.कुलकर्णी, योगेश गुरु इनामदार वाळुजकर शास्त्री, प्रभाकर पाटील, बालाजी बेदरे, शिवकन्या नागठाणे सुजाता डहाळे, कलाबाई कांबळे, कमलबाई तेलंगे इत्यादी उपस्थित होते.
त्यानंतर परभणी येथील परम साईभक्त श्रीमती कमल ताई जाधव यांच्या वतीने परमपूज्य श्रीसाईबाबांना महाभिषेक संपन्न झाला.
अशी माहिती श्रीसाई स्मारक समितीचे प्रताप आमले यांनी दिली.