ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडा येथील बारा वर्षीय बालिकेचा विणयभंग , आरोपी ताब्यात

ग्रामीण प्रतिनिधी – महेश शेंडे विठ्ठलवाडा

गोडपीपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील एका 12 वर्षीय बलिकेचा गावातीलच एका 40 वर्षीय विवाहित पुरुषाने विनयभंग केल्याची खळबळजनक घटना गोंडपीपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा गावात दि.21सप्टेंबर रोज मंगळवारला घडल्याची माहिती गोंडपीपरी पोलिसांनी आज दि.23 सप्टेंबर रोज बुधवारला दिली. घरात एकटी असलेल्या बारा वर्षीय बालिकेचा विनयभंग करणाऱ्या चाळीस वर्षे विवाहित पुरुषाला गोंडपिपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे घडली. आरोपीविरोधात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील सुधाकर बुध्दाजी अवथरे वय 40 वर्ष असे आरोपीचे नाव आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी एक वाजता च्या सुमारास सदर बालिकेचा विनयभंग करत अत्याचार करण्याचा प्रयत्न अवथरे यांनी केला. व्यक्तिगत कामानिमित्त पीडितेचीआई बाहेरगावी गेली होती तर वडील शेतात गेले होते. पीडित कुटुंबियांचे नवीन घराचे बांधकाम सुरू असल्याने भाडेतत्वावर आरोपीच्या घरी राहत होते.अश्यातच पीडितेला घरात एकटे बघून आरोपीने विनयभंग केला .
झालेल्या घटनेचा प्रकार पीडित बालिकेने कुटुंबीयांना सांगितला.
वडिलांनी पोलीस स्टेशन गाठले व पोलिसात तक्रार दाखल केली ठाणेदार जीवन राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय धर्मराज पटले यांनी बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीनंतर त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली.पुढील तपास मुल येथील पोस्को पथकाच्या प्रमुख रामटेके मॅडम करीत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close