ग्राम पंचायत सदस्याच्या पतीची दादागिरी
महिलांना केली अश्लील शिवीगाळ, पोलीसात तक्रार दाखल
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
सध्या शेतीचे काम सुरू असल्याने खेडेगावातील सर्व महिला शेतमजुरीच्या कामाला जात आहे.बोर्डा गावातील वॉर्ड क्र.2 मधील काही महिला पुनवटकर नावाच्या इसमाच्या शेतात कामाला जात होत्या.त्यात शारदा येटे,अनिता कोडापे,मीना अंबादे,सुनंदा सोयम,शांताबाई सोयाम या महिला कामाला जात होत्या.काल सायंकाळी वाहन चालकाने महिलांना कामावरून परत घरी सोडले. कॅटरर चे काम करणाऱ्या अनिल इंगळे याने वाहन चालकसोबत वाद घातला व चिडून सदर वाहन चालकाला शिवीगाळ केली.तसेच शेतमजुरीच्या कामाला जाणाऱ्या महिलांना अश्लील शिवीगाळ केली.अश्लिल शिवीगाळ केल्या वरून जाब विचारायला गेलेल्या शेवंता जांभूळे व शारदा उमेश येटे या महिलेला अनिल इंगळे याने अश्लील शिवीगाळ केली.त्यानुसार सर्व महिला तक्रार करण्यासाठी गेल्या असता पोलीस स्टेशन वरोरा येथे सदर तक्रारीची दखल घेत तक्रार दाखल करण्यात आली .सदर कारवाई वर समाधानी नसल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे पीडित शेवंता जांभूळे व शारदा उमेश येटे या दोन्ही महिलांनी सांगितले.पीडित महिलांच्या शेतमजुरीच्या कामावर जाणाऱ्या सर्व महिला पाठीशी आहे.