ताज्या घडामोडी

चंद्रपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेची देहव्यापार करणाऱ्यावर धडक कारवाई

उपसंपादक :विशाल इन्दोरकर

चंद्रपूर :- पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांना देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना पथक तयार करण्याचे आदेश देण्यात आले असून पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी आदेशानुसार पथक तयार केले. दिनांक २५-०९-२०२१ला चंद्रपुर शहरातील गौतम नगर, येथे एक महिला आर्थिक फायदयाकरीता अल्पवयीन मुलीकडुन देहव्यापार करीत असल्याची खात्री पुर्वक माहिती मिळाली. मिळालेल्या माहिती आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रपूर गौतम नगर येथे रेड कार्यवाही केली असता दोन महिला परराज्यातील अल्पवयीन मुलीकडुन देहव्यापार करीत असतांना पोलीसांनी ताब्यात घेतले.त्यांचे कडुन राजस्थान, तेलंगणा, मध्यप्रदेश यातील तिन पिडीत मुलींची सुटका करून महिलांना आधार गुह चंद्रपूर येथे दाखल केले.
पुढील कार्यवाहीत दोन महीला आरोपी विरोधात पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे अपराध कमाक ७५९/२०२१ कलम ३७०,३७० (ए), ३७१ भा.द.वी. सह कलम ३,४,५,६,७ अनैतीक मानवी व्यापार प्रतीबंधक अधिनीयम १९५६ अन्वये गुन्हा नोद करण्यात आला आहे. पुढील गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन चंद्रपुर शहरचे अधिकारी करीत आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधिक्षक अरविंद साळवे चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा, पो. नि. पुसाटे नियंत्रन कक्ष चंद्रपुर यांचे सह स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोलीस उप निरीक्षक संदिप कापडे, पोलीस उप निरीक्षक अतुल कावळे, स.फौ. नितीन जाधव, पो.हवा. संजय आतकुलवार, ना.पो.कॉ. सुधीर मत्ते, पो.कॉ. नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, कुंदनसिंग बावरे, प्रांजल झिलपे, रविंद्र पंधरे, म.पो.शि. निराशा तितरे, अपर्णा मानकर यांनी केली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close