चिमूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नेरी पोलिस चौकिला पूर्ण वेळ पोलिस कर्मचारी नीयूक्त करा

शिवसेना महिला आघाडीचे पोलिस निरीक्षण मनोज गभने ला निवेदन.
ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
चिमूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नेरी पोलिस चौकीचा कार्यभार पोलिस उप निरीक्षक श्री गायकवाड़ साहेब 4 पोलिस कर्मचारासाहित उत्तम रित्या सांभाळत आहेत, पन नेरी पोलिस चौकीला 30 गावे समाविष्ट असून रात्रीच्या वेळेला एकही पोलिस कर्मचारी उपस्थित राहत नाहीत, नेरी शहर हे व्यापारी दृष्टिकोनातून महत्वाचे ठिकाण असून चिमूर मुख्यालयापासुन १० किलोमीटर अंतरावर आहे, नेरी पोलिस चौकीपासुन पोलिस चौकी अंतर्गत येणारे गावे 11 ते 15 किलोमीटर अंतरावर असून रात्रीच्या वेळेला कोणतीही अनुचित घटना घडल्यास चिमूर पोलिस स्टेशनला जाण्यास अंतर जास्त होत असल्यामुळे पोलिस स्टेशनला पोहचने शक्य होत नाही, चौकीला रात्रिपाळीत पोलिस कर्मचारी राहत नसल्यामुळे अवैध धंदेवाइक सरसावले आहेत, नेरी चौकीला रात्र पाळीत पोलिस कर्मचारी उपस्थित रहिल्यास अवैध धंदे, महिला अत्याचार, व नागरिकांना कोणत्याही प्रकरनाची तक्रार देण्यास कोणतीही अड़चन येणार नाही, व चिमूर मुख्यालय येते जाण्याचा त्रास वाचेल, करीता नेरी पोलिस स्टेशनला पूर्ण वेळ पोलिस कर्मचारी नियुक्ति करण्यात यावे, या करीता आज शिवसेना महिला आघाडी नेरी च्या वतीने पोलिस निरीक्षण मनोज गभने याना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदन देते वेळी शिवसेना चिमूर तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, महिला आघाडी तालुका प्रमुख माधुरी केमये, उपतालुका प्रमुख सुधाकर निबटे, महिला आघाडी उपतालुका प्रमुख विधा घुघूसकर, महिला आघाडी विभाग प्रमुख दीपकौर भौंड, विभाग विभाग प्रमुख आशीष बगुलकर, चिमूर शहर प्रमुख अनंता गिरी, गंगूबाई मसराम, रंजना निबटे, प्रसिद्धि प्रमुख सुनील हिंगणकर उपस्थित होते.
प्रतिक्रीया ….
या विषयावर मि निर्णय घेतला असून नेरी पोलिस चौकीला पूर्ण वेळ पोलिस कर्मचारी नियुक्ति करणार असून लवकरात लवकर आम्ही प्रक्रिया पूर्ण करू.
= पोलिस निरीक्षक मनोज गभने चिमुर