ताज्या घडामोडी

कलावंतांच्या कलागुणांना सदैव प्रोत्साहन देणारा महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं गृप -किरण साळवी यांचे मनोगत

प्रतिनिधिःरामचंद्र कामडी

महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृप नवोदित कलावंतांना सदैव प्रोत्साहन देणारा गृप असल्याचे मनोगत चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगरीच्या उच्च शिक्षित सुपरिचित सामाजिक महिला कार्यकर्त्या तथा व्हर्चुअस मल्टीपर्पज संस्थेच्या संस्थापिका -अध्यक्ष कु. किरण विजय साळवी यांनी व्यक्त केले .त्या आज शहरातील एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आल्या असता त्या वेळी त्या एका भेटी दरम्यान बोलत होत्या. दरम्यान सहज सुचलंच्या मार्गदर्शिका मायाताई कोसरे व अधिवक्ता मेघा धोटे यांचेसह रंज्जू मोडक,वर्षा कोंगरे, मुग्धा खांडे ,सुपरिचित कवयित्री अर्चना सुतार,सिमा पाटील, रजनी रणदिवे, श्रुति उरणकर, स्मिता बांडगे, मंथना नन्नावरे,विजया तत्वादी,सविता भोयर,अल्का सदावर्ते, वंदना हातगांवकर, स्मिता मेहेत्रे, संगिता पाटील, दिक्षा तेली , उज्वला नगराळे, वर्षा शेंडे सोनाली गोडाने, कल्याणी सरोदे आदीं सदस्यगणांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्या म्हणाल्या .विशेषता सहज सुचलंच्या नवोदित सदस्य रश्मी पचारे, प्रियंका जगझाप, पायल दुपारे , सायली टोपकर, मेघा शेंडे , पुनम कोसरे, रजनी तेलंग ,प्रिती उमरे ,रसिका ढोणे ,अंजू पिंपळे,मेघा मिलमिले किर्ती पांडे यांचा देखिल त्यांनी बोलताना या वेळी उल्लेख केला. एव्हढेच नाही तर त्यांनी पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देखिल दिल्या .सहज सुचलंचा प्रदीर्घ प्रवास बघता त्यांनी सर्व सदस्यगणांचे कौतुक करीत त्यांचे अभिनंदन केले आहे.गृप वरील जास्मिन शेख, सरोज हिवरे , श्रध्दा हिवरे , प्रतिभा चट्टे, , प्रतिभा पोहनकर यांच्या कार्याची त्यांनी तोंडभरून स्तुती केली . विशेष उल्लेखनीय बाब अशी विदर्भातील पथ्रोटच्या जेष्ठ साहित्यिक विजया भांगे ह्या काही काही काळ महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं गृपच्या मार्गदर्शिका राहिल्या आहेत.त्यांचे योगदान सहज सुचलं साठी फार मोलाचे ठरले आहे.काही वर्षांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अभियंता कु.रितू लोहकरे यांनी या व्हाॅटसअप गृपची मुहूर्तमेढ रोवली होती.बघता बघता हा गृप अल्पकालावधीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्याचे किरण साळवी या वेळी बोलताना म्हणाल्या.गृपवरील सर्वच सदस्यांची कामगिरी उल्लेखनीय अशीच आहे.आजच्या घडीला सहज सुचलंची सदस्य संख्या दोन हजारच्या घरात आहे.हे विशेष!

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close