ताज्या घडामोडी

वाघाच्या हल्यात इसम ठार

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे

दिनांक 25/8/21 ला गोगाव येथील शेतकरी व त्याचा मुलगा शेतात गेले असता मुलगा गोगावला परत गेला व वाडिलांना वाघ आहे लवकर घरी परत या असे बोलुन गेला परंतु वडिल लवकर आले नाही सदर घटना सांयकाळी 6 वाजताची आहे रामाजी हनाजी चुधरी वय 69 वर्ष हे जगंलाला लागुन असलेल्या स्वताच्या शेतात काम करत होते काम करत असतांना त्यांच्यावर वाघाने हल्ला करुन त्यांना ठार केले सदर घटना वडसा वनविभागा अंतर्गत पोर्ला वनपरिक्षेत्रातील चुरचुरा उपक्षेत्र व चुरचुरा नियंत्रणक्षेत्रा मधील खंड क्र. 54 मधील गोगाव जवळील जंगलात घडली या अगोदर ही महिन्याच्या पाहिल्या दोन हप्त्यात चुरचुरा माल व भिकार मौशी येथील शेतात जानाऱ्या दोन इसमास याच वाघाने ठार केले होते वरील घटनेची माहीती होताच उपवनसंरक्षक वडसा व वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करुन शव विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे पाठवण्यात आले पुढील तपास उपवनसंरक्षक वडसा हे करत आहेत . या नरभक्षी वाघाचा लवकरत लवकर बंदोबस्त करा अशी मागणी गोगाव येथील गावकऱ्यांची आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close