ताज्या घडामोडी

नेरी ग्रामपंचायतवर कॉग्रेंसचे वर्चस्व

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे

चिमुर तालुक्यात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नेरी ग्रामपंचायत वर १० फेब्रुवारीला झालेल्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीत काँग्रेसंनी बाजी मारली आहे. काँग्रेस समर्थीत प्रगती पँनलकडे ९ सदस्य होते .तर शेतकरी पँनलकडे ६ , अपक्ष – २ असे ८ नवनिर्वाचित सदस्य होते . नेरी ग्राम पंचायत मध्ये झालेल्या सरपंच पदाच्या निवडीत काँग्रेसचे सौ.रेखा नानाजी पिसे सरपंच तर उपसरपंच चंद्रभान दादाराव कामडी यांची आठ विरुद्ध नऊ मताने निवड करण्यात आली .
मोठ्या प्रमाणात या सरपंच पदाच्या निवडीत डावपेच विरोधकाकाकडुन आखले होते . पण ते निष्फळ ठरले . अखेर काँग्रेसच्या रेखा पीसे सरपंच पदी विराजमान झाल्या आहेत . तर चंद्रभान कामडी यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली.
या ग्रामपंचायत निवडणुकीत गट प्रमुख संजयभाऊ डोंगरे यांंची खुप मेहनत आहे तसेच त्यांचे सहकारी राम राउत सर , लताताई पिसे सभापती चिमुर पंचायत समीती , रामदासजी सहारे माजी सरपंच , अरूण पीसे , प्रशांत पीसे , अनिल पंधरे , रवींद्र पंधरे , मनोहर पीसे , रुस्तमखाँ पठाण, संजय घुटके, शंकर पिसे माजी पो.पा ,ओम खैरे माजी प. स. सदस्य , संजय नागदेवते, हरिश्चंद्र बांगडे, सौ पद्मश्री संजय नागदेवते, संगीता कामडी, संगीता वैरागडे,पदमा झिले, निखिल पिसे,नानाजी दडमल,या नवनिर्वाचीत सदस्यांनी सरपंच व उपसरपंचाचे अभीनंदन केले

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close