ताज्या घडामोडी

नवगण महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ मधुकर आघाव यांची निवड

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

परळी येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये गेल्या 28 वर्षापासून प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे डॉ मधुकर आघाव यांची नुकतीच महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
परळी तालुक्यामध्ये राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये डॉ आघाव यांची यशस्वी वाटचाल राहिलेली आहे. वैद्यनाथ उद्योग समूहाचे चेअरमन म्हणून त्यांनी अनेक फॉर्म यशस्वी चालविल्या आहेत. जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी उत्तम कार्य केलेले आहे. वाणिज्य विषयांमध्ये डॉक्टरेट पदवी मिळाल्यानंतर त्यांची वाणिज्य व इतर सांस्कृतिक क्षेत्रातील काही पुस्तके प्रकाशित आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये त्यांचे शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या प्रशासकीय कामांचा लाभ महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी व्हावा व संस्थेची जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडावी म्हणून क्षीरसागर कुटुंबीयांनी त्यांच्यावर विश्वास दर्शविलेला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल पालकमंत्री श्री धनंजय मुंडे साहेब यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे तसेच संस्थेचे सचिव डॉ भारतभुषणजी क्षीरसागर संस्थेच्या मार्गदर्शक डॉ दीपाताई क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा अध्यक्ष युवा नेते डॉ योगेश भैय्या क्षीरसागर, डॉ सारिकाताई क्षीरसागर तसेच नवगण महाविद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे डॉ अनिल घुगे, श्री बाळासाहेब देशमुख, श्री उदगीरकर, संस्थेच्या प्रशासकीय समितीचे श्री देशमाने सर, श्री गुट्टे सर, उपप्राचार्य डॉ लालासाहेब घुमरे इत्यादींनीही त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे. डॉ आघाव यांच्या निवडीमुळे परळीच्या शैक्षणिक वातावरणात उत्साह दिसून येत असून महाविद्यालयाच्या कर्मचारी व विद्यार्थ्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close