ताज्या घडामोडी

कोर्धा येथील ग्रामसभे मध्ये ग्रामसेविकेवर ग्रामस्था कंडून कारवाई करण्याची मागणी

तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड

नागभीड तालुक्यातील कोर्धा येथे ग्रामपंचायतीच्या वतिने दिनांक १७ / ९ / २०२१ ला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले . या सभेसाठी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी , विस्तार अधिकारी , जिल्हा परिषद सदस्य व ग्रामस्थ उपस्थित झाले मात्र ऐनवेळी ज्यांनी या सभेचे आयोजन केले त्या ग्रामसेविकेने या सभेला पाठ दाखवल्याने ग्रामस्थ संतप्त झाले व त्यांनी मुजोर ग्रामसेविकेवर कारवाई करा असी मागणी अधिकाऱ्यांकडे केली . मिळालेल्या माहितीनुसार दिनांक १ / ९ / २०२१ ला तहकुब झालेली कोर्धा येथील ग्रामसभा ९ / ९ / २०२१ ला आयोजीत करण्यात आली . या सभेत ग्रामसेविका रामटेके यांनी “ मागील सभेचे इतिवृत्त वाचुन कायम करणे ” व जमा खर्चाचा हिशेब हे दोन विषय विषय पत्रिकेत घेतलेच नाही . मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवा व जमा खर्चाचा हिशेब ग्रामसभेत सांगा असी ग्रामस्थांची – मागणी होती . मात्र ग्रामसेविकेने – ग्रामस्थाचे काहीही न ऐकता अरेरावी । सुरु केली त्यामुळे ग्रामस्थ बिथरले . । अखेर जिल्हा परिषद सदस्य संजय – गजपुरे यांनी मध्यस्थी केल्यावर ग्रामस्थ शांत झाले . व सभा तहकुब करण्यात – आली . तीच तहकुब झालेली सभा दिनांक १७ / ९ / २०२१ ला आयोजीत करण्यात आली होती पण ग्रामसेविकेच्या गैरहजरीने अधिकारी , लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ निराश झाले . आता अशा मुजोर ग्रामसेविकेवर अधिकारी काय कार्यवाही करतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close