अनुसूचित जमाती विद्यार्थी व नागरिकांना “जाती वैधता प्रमाणपत्र” कसे प्राप्त करावे याकरिता ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात यावे
उपसंपादक :विशाल इन्दोरकर
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद,नागपूर विभाग ची मागणी
कोविड_१९ प्रादुर्भाव मूळे अनेक अनुसूचित जमाती चे विद्यार्थी प्रत्यक्ष पडताळणी समिती कार्यालयात माहिती साठी येऊ शकत नाही,तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशा करिता व भविष्यात विशेष पद भरती करिता अनुसूचित जमाती उमेदवारांना जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य असल्यामुळे “जात वैधता प्रमाणपत्र” कसे प्राप्त करावे,त्यासाठी आवश्यक कागदपत्र, संकेतस्थळ,अर्ज इत्यादी माहिती, अनुसूचित जमाती उमेदवारांना मिळावी यासाठी ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद,नवी दिल्ली,नागपूर विभाग द्वारा मा.प्रीती बोंद्रे (कुलकर्णी), उपायुक्त, अनुसूची जमाती पडताळणी समिती नागपूर यांना निवेदन देऊन करण्यात आले ,ऑनलाईन मार्गदर्शनाची लिंक सर्व आदिवासी सामाजिक संघटना, शाळा,महाविद्यालय यांना पाठविण्यात यावी अशी मागणी परिषदेचे दिनेश शेराम,स्वप्नील मसराम,राहुल मसराम,यशवंत मसराम,राहुल मडावी यांनी केली.धन्यवाद!!!