ताज्या घडामोडी

नेरी -नवरगाव रस्त्यावर ट्रॅक्टर व दुचाकीची धडक

दुचाकीस्वार गंभीर जखमी

ग्रामीण प्रतिनिधी : रामचंद्र कामडी नेरी

खांबाडा येथील एक युवक नेरी येथे आपल्या दुचाकीने काही कामानिमित्य आला असता तो ट्रॅक्टरच्या धडकेत गंभीर जखमी झाला
रोशन नन्नावरे राहाणार खांबाडा वय 21 वर्ष हा आपल्या दुचाकी क्रमांक MH34-AX-7311 ने नेरी ला आला होता आपले कामे आटोपुन आपल्या गावाला खांबाडा जात असतांना नेरी बाहेर निघताच नेरी नवरगाव रस्त्यावर विरुद्ध दिशेने येनाऱ्या बिना नबंरच्या ट्रॅक्टरनी त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली यात रोशन नन्नावरे हा गंभीर जखमी झाला नेरी येथील काही सुज्ञ नागरीकांनी त्याला ग्रामीण रुग्णालय नेरी येथे घेऊन गेले असता रुग्णालयात एकही निवासी डॉक्टर नसल्यामुळे त्याला उपजिल्हा रुग्णालय चिमुर येथे हलविव्यात आले . उपजिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला .
ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर घेऊन पळुन जाण्याच्या प्रयत्नात त्या रस्त्यावरून येणारे काही नागरीक थोडक्यात बचावले काहींनी त्याचा पाठलाग करुण ट्रॅक्टर पकडले व पोलीस चौकी नेरी येथे घेऊन आले ट्रॅक्टर चालकाचे नाव कळु शकले नाही टूॅक्टर मालक लावारी येथील कोकोडे आहे अशी नागरीकांमध्ये चर्चा आहे पुढील तपास चिमुर पोलीस करीत आहेत

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close